अंधेरीतील इमारतीला आग; 27 जणांची सुखरूप सुटका, 4 जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2026

अंधेरीतील इमारतीला आग; 27 जणांची सुखरूप सुटका, 4 जण जखमी


मुंबई - अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवर असलेल्या चांदिवाला पर्ल रीजेन्सी या 18 मजली निवासी इमारतीत आज (शनिवारी 3 जानेवारी 2026) दुपारी भीषण आग लागली. या आगीत अडकलेल्या 27 जणांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली, तर अग्निशमन दलातील तीन जवानांसह एक महिला रहिवासी जखमी झाली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

ही आग दुपारी 2.10 वाजता मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली होती. आग इमारतीच्या पहिल्या ते चौथ्या मजल्यामधील इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगमध्ये लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात दाट काळा धूर पसरला होता.

माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, 108 रुग्णवाहिका आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग दुपारी 2.37 वाजता लेव्हल-1 म्हणून घोषित करण्यात आली होती. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी 4.35 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.

दरम्यान, जखमींना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS