BMC Election - मुंबईत दुपारी 3.30 पर्यंत 41 टक्के मतदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

BMC Election - मुंबईत दुपारी 3.30 पर्यंत 41 टक्के मतदान

Share This

मुंबई - सुमारे आठ वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळच्या सत्रात मतदान केंद्र बदलणे, मतदार यादीत नावे नसणे आदी समस्यांमुळे मतदानाचा वेग मंदावला होता. मात्र दुपारनंतर मतदारांचा सहभाग वाढल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली.

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष, ४८ लाख २६ हजार ५०९ महिला तसेच १ हजार ९९ इतर मतदारांचा समावेश आहे. गुरुवारी (१५ जानेवारी २०२६) सकाळपासून सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४२ लाख ४९ हजार ७१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे शहरातील एकूण मतदानाची टक्केवारी ४१.०८ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २२७ प्रभागांमध्ये सुमारे १,७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळच्या तुलनेत दुपारनंतर मतदानाचा वेग वाढलेला दिसून आला. सायंकाळपर्यंत मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, काही ठिकाणी मतदान केंद्र बदलण्यात आल्याने मतदारांची धावपळ झाली. मतदार यादीत नावे नसणे, तसेच मतदानानंतर शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या. यामुळे मुंबईकर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

मतदानाची टक्केवारी  —
सकाळी ९.३० वाजेपर्यंत : ६.९८ टक्के

सकाळी ११.३० वाजेपर्यंत : १७.७३ टक्के

दुपारी १.३० वाजेपर्यंत : २९.९६ टक्के

दुपारी ३.३० वाजेपर्यंत : ४१.०८ टक्के

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages