जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रची नवी राज्य कार्यकारणी जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 January 2026

जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रची नवी राज्य कार्यकारणी जाहीर


मुंबई - जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र (JUM) या संघटनेची नवीन राज्य कार्यकारणी १ जानेवारी २०२६ ते १ जानेवारी २०२८ या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारणीत अध्यक्षपदी नारायण पंचाल यांची निवड करण्यात आली आहे.

उपाध्यक्ष म्हणून बी. डी. गायकवाड आणि काशिनाथ मटाल यांची नियुक्ती करण्यात आली असून, सरचिटणीसपदी राजेंद्र सालसकर यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सचिव म्हणून अ‍ॅड. नामदेव काशीद, तर कोषाध्यक्ष म्हणून सतीश सटाम यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सल्लागार म्हणून हेमंत सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्यांमध्ये गणेश चव्हाण, प्रविण काजरोळकर, लाल प्रताप सिंग आणि भारती बारस्कर यांचा समावेश आहे. तसेच राज्य समिती सदस्य म्हणून दिलीप पटेल, अ‍ॅड. नाना अहिरे, प्रशांत गायकवाड, निलेश फापाळे, प्रविण दवणे, अन्नान शिंपी, मुकेश धावडे, अंकुश पोटाळे, अजेयकुमार जाधव, रमेश पाटील, धीरज सिंग, संजय खानविलकर आणि सुबोध शाक्यरत्न यांची निवड करण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्यासह संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS