मुंबई - पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची क्षमता नसते. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे मत Brijesh Singh यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Mumbai Marathi Patrakar Sangh येथे आयोजित ‘एआय परिषद २०२६’चे उद्घाटन ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष Sandeep Chavan, उपाध्यक्ष Swati Ghosalkar, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य आणि कार्यवाह शैलेंद्र शिर्के उपस्थित होते.
सिंह म्हणाले की, मानव इतिहासात ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया छपाई तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मोठ्या प्रमाणावर बदलली. त्यानंतर प्रसारमाध्यमांचा विकास झाला. दूरदर्शन सुरू झाले तेव्हा वृत्तपत्रांना धोका वाटत होता, तर डिजिटल माध्यमे आल्यावर टीव्हीला धोका वाटू लागला. मात्र या सर्व बदलांनंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले. भविष्यातही पत्रकारिता टिकेल, मात्र स्वयंचलित होऊ शकणारी अनेक कामे एआयमुळे ऑटोमेटेड होतील, असे त्यांनी सांगितले.
आज जगात काही ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत असून बातम्यांचे संकलन, लेखन, संपादन, फॅक्ट-चेकिंग आणि पेज लेआउटसारखी कामे एआयच्या साहाय्याने केली जात आहेत. वित्त, क्रीडा आदी अनेक क्षेत्रांतील बातम्या मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित पद्धतीने तयार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो,” असे सांगत पत्रकारांनी एआय कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रकारांसाठी ‘एआय इन जर्नलिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
एआयमुळे बातम्या रिअल-टाईम, गतिमान आणि वैयक्तिकृत स्वरूपात तयार होत आहेत. मात्र एआय प्रणाली कधी कधी चुकीची माहितीही निर्माण करू शकते. ‘हॅलुसिनेशन’मुळे नसलेले संदर्भ तयार होण्याची शक्यता असल्याने एआय-निर्मित सामग्रीची अंतिम जबाबदारी संपादकीय स्तरावरच राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.
एआयची एक मोठी मर्यादा म्हणजे भारतीय भाषांचे आकलन. मोठ्या लँग्वेज मॉडेल्समध्ये मराठीसह भारतीय भाषांचा डेटा कमी असल्याने भारतीय संदर्भ आणि संस्कृती पूर्णपणे समजणे एआयसाठी कठीण आहे. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र एआय विकास आणि “डेटा सार्वभौमत्व” महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एआयमुळे डिप फेकसारख्या तंत्रज्ञानाचा धोका वाढत असल्याचे सांगत त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एआय आधारित फॅक्ट-चेक प्रणाली सुरू केल्याची माहिती दिली. संशयास्पद व्हिडिओ किंवा माहितीची पडताळणी करून ती खरी की खोटी हे तपासण्याची सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमात अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेत मोठे बदल झाल्याचे सांगत पत्रकारांनी नव्या साधनांशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

No comments:
Post a Comment