संयुक्त महाराष्ट्र दालनाची दुर्दशा; Kishori Pednekar यांचा प्रशासनावर हल्लाबोल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2026

संयुक्त महाराष्ट्र दालनाची दुर्दशा; Kishori Pednekar यांचा प्रशासनावर हल्लाबोल


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र दालनाच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्ष नेत्या Kishori Pednekar यांनी दालनाची पाहणी करत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

“गेल्या चार वर्षांपासून पालिकेवर प्रशासक राज आहे. मात्र या काळात दालनाची पूर्णपणे उपेक्षा झाली आहे. सध्या इथे कबुतरांची शाळा भरतेय. ‘आंधळ दळतंय आणि कुत्रे पीठ खातंय’ अशी अवस्था झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

मुंबईकरांना सत्ता कुणाच्या हातात दिली आहे, हे आता स्पष्ट दिसत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले. “हे दालन तुमच्या कक्षेत येत नाही का? एकही अधिकारी येथे उपस्थित नाही. अधिकारी आतमध्ये येतच नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.

दालनासाठी मंजूर करण्यात आलेला निधी खर्च न झाल्याचा आरोप करत, निधी कुठे खर्च झाला याची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याचे सांगत, दालनातील फोटोंना बुरशी लागल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, जोपर्यंत प्रशासन येऊन ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा इशाराही Kishori Pednekar यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS