मुंबईत ३० तास पाणीपुरवठा बाधित; ५–६ मे रोजी अनेक भागांत पाणी बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत ३० तास पाणीपुरवठा बाधित; ५–६ मे रोजी अनेक भागांत पाणी बंद

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या जलपुरवठा विभागामार्फत अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे–तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतच्या जलबोगद्याचे कार्यान्वयन करण्यासाठी महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे मंगळवार, ५ मे २०२६ रोजी सकाळी १० ते बुधवार, ६ मे रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत (एकूण ३० तास) शहरातील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

महापालिकेकडून १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची जोडणी तसेच पूरक कामे केली जाणार आहेत. यासाठी तुर्भे उच्चस्तरीय जलाशयाची १८०० मिमी आणि निम्नस्तरीय जलाशयाची १२०० मिमी जलवाहिनी तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी एफ उत्तर, एफ दक्षिण तसेच एल, एम पूर्व, एम पश्चिम आणि एन विभागांतील अनेक भागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

महापालिकेने नागरिकांना या कालावधीत आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होऊन भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोणत्या भागांवर परिणाम - 
एफ उत्तर विभाग -
प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, संजय गांधी नगर, शांती नगर, एच. एम. मार्ग, के. डी. गायकवाड नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड, अल्मेडा संकुल (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).
 
शीव (पूर्व) व शीव (पश्चिम)  (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार)   

एफ दक्षिण विभाग – 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशॉ पेटिट मार्ग, एस. एस. राव मार्ग, डॉ. एर्नेस्ट बोर्जेस मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्ग, एन. एम. जी. एस. मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, सेंट पॉल मार्ग, सेंट झेवियर मार्ग, खाशाबा मार्ग, महादेव पालव मार्ग, जिजीभॉय लेन, आचार्य दोंदे मार्ग, विठ्ठल चव्हाण मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बाटलीवाला गल्ली, चमार बाग मार्ग, आई माई मेरवानजी मार्ग, शिरोडकर मार्ग, चिवडा गल्ली, साने गुरुजी मार्ग, आनंद मालवणकर मार्ग, गॅस कंपनी गल्ली (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)

एल विभाग - 
साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांतीनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नवीन टिळक नगर (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

कुरेशी नगर (कसाईवाडा) (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ व बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

हिल मार्ग ,ताडी पेठ, मुक्तादेवी मार्ग, गावदेवी मंडळ, डोंगर परिसर, पाटील गल्ली, गुलमोहर गल्ली, पंचशील नगर (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), केदारनाथ मंदिर मार्ग, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस वसाहत, कुर्ला कारशेड, रेल्वे वसाहत, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, राहुल नगर, एव्हरार्ड नगर, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा स्ट्रीट, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडा वसाहत, समर्थ नगर  (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

एम पूर्व विभाग -
लल्लूभाई संकुल, कमला रमण नगर, रमण मामा नगर, शिवाजी नगर, लोटस वसाहत, गौतम नगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, वाशी नाका, मानखुर्द (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

बैंगणवाडी, मानखुर्द, भारत नगर, म्हाडा इमारती, चिता कॅम्प, साठे नगर, झाकिर हुसेन नगर, देवनार गाव, देवनार वसाहत, न्यू भारत नगर, हशू अडवाणी नगर, नटवर पारेख संकुल (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

सह्याद्री नगर, वाढवली गाव, बी. ए. आर. सी. वसाहत, कमला रमण नगर, रमण मामा नगर, डम्पिंग सप्लाय (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

रफिक नगर, मंडाळा गाव, न्यू मंडाळा, पद्मा नगर, विष्णू नगर, एल. यू. गडकरी मार्ग, आर. एन. ए. पार्क, कुकरेजा इमारती, वाशी नाका, चिता कॅम्प, महाराष्ट्र नगर, म्‍हाडा इमारती, इंडियन ऑइल नगर (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

बी. डी. पाटील मार्ग येथील रिफायनरी विभाग, एच. पी. सी. एल., बी. पी. सी. एल. (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी सकाळी १० ते बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)

एम पश्चिम विभाग - 
मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण, सुभाष नगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत, स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत, डब्लू. टी. पाटील मार्ग, मुक्ती नगर, काशिनाथ पाटील वाडी, संतोष नगर, केळकर वाडी, डायमंड गार्डन, सेंट्रल अव्हेन्यू मार्ग, एन. बी. पाटील मार्ग, जनार्दन पाटील मार्ग, घाटला गाव, एस. टी. ऍंथोनी मार्ग, चंद्रोदय सोसायटी, एस. जी. बर्वे मार्ग, चरई गाव, बोरला सोसायटी (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार व बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार).

एम. एस. इमारत क्रमांक १ - ३२ (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार) (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, सुमन नगर, भक्ती भवन, चिखल वाडी, समर्थ नगर, बसंत पार्क, सी. जी. गिडवाणी मार्ग, गांधी बाजार, जनता बाजार, इंदिरा नगर, नवजीवन सोसायटी, गोल्फ क्लब, राम टेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर वसाहत, कोकण नगर, गणेश नगर, विजय नगर, अशोक नगर, अण्णाभाऊ साठे मार्ग, सिंधी सोसायटी, जिल्हाधिकारी वसाहत, मारवली चर्च, आर. सी. मार्ग (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार व बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार). 

माहुल गाव, आंबापाडा गाव, म्हैसूर वसाहत, वाशी गाव, डी. बी. रियल्टी इमारत, वाडवली, शरद नगर, लक्ष्मी नगर, जनता नगर, वाशी नाका, जिजामाता नगर (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार व बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार).   

भक्ती पार्क येथील सर्व इमारती व एम. एम. आर. डी. ए. इमारत (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार व बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार).     

टिळक नगर, ठक्करबाप्पा वसाहत, पेस्तम सागर, शेल वसाहत, सहकार नगर, वत्सलाताई नाईक नगर, श्रमजीवी नगर (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

पी. एल. लोखंडे मार्ग, एकता मित्र मंडळ, मालेकर वाडी, पी. वाय. थोरात मार्ग, रमाबाई वसाहत, अमीर बाग, जनता नगर, मोतिलाल रहिवाशी संघ, कादरिया नगर, महात्मा फुले नगर, अजंठा वसाहत, सहदीप वसाहत, मुकुंद नगर, पंजाबी चाळ, नागे वाडी, छेडा नगर (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

एन विभाग -
विद्याविहार (पूर्व), चित्तरंजन नगर, राजावाडी (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार).

संपूर्ण घाटकोपर (पूर्व) विभाग, पंत नगर, गारोडिया नगर, लक्ष्मी नगर, बेस्ट वसाहत, नायडू वसाहत, रमाबाई नगर, कामराज नगर, विक्रोळी गाव, गोदरेज ट्रीज (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ व बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)      

घाटकोपर (पश्चिम) येथील काही परिसर, विद्याविहार (पश्चिम), नारायण नगर, महात्‍मा गांधी मार्ग, लालबहादूर शास्‍त्री मार्गापासून एन. एस. एस. मार्ग ते श्रेयस सिनेमा, कामा गल्ली, किरोळ आणि खलई गाव, पारसी वाडी, चिराग नगर, महेंद्र पार्क, नवीन माणेकलाल (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ व बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)      

सर्वोदय रुग्णालय, जीवदया गल्ली, भीम नगर येथील पाण्याच्या टाक्या, नित्यानंद नगर, पवार चाळ, पाटीदार वाडी, गंगावाडी, बरोट वाडी (मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ व बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार)      

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages