घाटकोपरमध्ये १० एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्ववत, पाणी उकळून पिण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2026

घाटकोपरमध्ये १० एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्ववत, पाणी उकळून पिण्याचे आवाहन


मुंबई - घाटकोपर (पश्चिम) येथील निम्नस्तरीय जलाशयाच्या दोन्ही कप्प्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्याने १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

दुरुस्तीच्या कालावधीत पाणीपुरवठ्याच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला होता. मात्र आता दुरुस्ती पूर्ण झाल्याने पूर्वीप्रमाणेच वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

नारायणनगर व झोन एनएक्स-०३ अंतर्गत चिरागनगर, आझाद नगर, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट मार्ग, महिंद्रा पार्क, किरोळ गाव, विद्याविहार (पश्चिम) आदी भागात दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५ या वेळेत पाणीपुरवठा होणार आहे.

तसेच पंतनगर आऊटलेट व झोन एनएक्स-०६ मधील भीमनगर, गंगावाडी, सी.जी.एस. वसाहत, एल.बी.एस. मार्ग परिसरात सायंकाळी ६.४५ ते रात्री ११.०० या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येईल.

सर्वोदय बुस्टींग क्षेत्रातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ अशी पूर्ववतच राहणार आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पुढील पाच दिवस पाणी गाळून व उकळून पिण्याचे तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS