मुंबईतील 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

Share This

मुंबई - मुंबई महापालिकेच्या 2026 मध्ये संपन्न झालेल्या निवडणुकीतील तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून अनेक निवडणूक याचिका सध्या न्यायप्रविष्ट आहेत. काही प्रकरणांमध्ये सुनावणी सुरू असून एका प्रकरणात न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून उघड केलेल्या माहितीनुसार विविध प्रभागांतील निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे प्रभाग 119 ‘एस’ मधील शिवसेना नगरसेवक राजेश सोनावळे यांच्याविरोधातील याचिका न्यायालयाने रद्द केली असली, तरी उर्वरित अनेक प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणामुळे आगामी न्यायालयीन निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या सत्तासमीकरणावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या नगरसेवकांच्या निवडीला आव्हान -
याचिका दाखल असलेल्या नगरसेवकांमध्ये मोहम्मद रफीक मुस्तफा हुसेन, आनंद अनिल कोठावडे, ज्योती अनिल उपाध्याय, चेतन श्रीधर बेलकर, मोहम्मद सलीम कुरेशी, प्रतिमा शैलेश खोपडे, ललिता कचरू यादव, एजाज अहमद खान, कृष्णा वासुदेव म्हाडगुट, मनीषा मनोहर पांचाळ, जाहिद युनूस खान, रंजिता केतन दिवेकर शिवलकर, सारिका मंगेश पवार, विश्वजीत शंकर धोलम, विनोद उदयनारायण मिश्रा, संजीव कुमार कालकोरी, अर्जुन आनंद शिंदे, संदीप हनुमंत खारत, फरहीन मोहम्मद जमशेद खान, प्रिया रुपेश पाटील, विजय ताराचंद लाम्बा, विनोद दामोदर घोगडे, मोहम्मद मेहफूज शेख, राजू श्रीपाद पेडणेकर, समरा फातिमा आरिफ खान, स्मिता शंकर म्हात्रे, गौरव अरुण राणे, राजुल सुरेश पटेल, सिद्धार्थ कडाजी उस्तुरे, शैलेंद्र अनंत मोरे, एकता विनोद चौधरी, इब्राहिम युसुफ मुल्ला, तन्वी दिनेश राव, स्नेहा चंद्रशेखर भाटकर, प्रसाद प्रभाकर आयरे, शीतल अशोक म्हात्रे, वंदना गौतम साबळे, हर्षदा गजानन पाटील, जितेंद्र सहदेव राऊत, प्रिया सावर्णकर गुरव, पायल संदीप नाईक, गौसिया साजेद अकबर शेख, संजय बाबुराव अव्हाड, भाग्यलक्ष्मी लालसिंग ताजपुरोहित, रुपेश अशोक पाटील, दिनेश अनंत साळवी, सुवर्णा सहदेव करांजे, सुमित कुंडलिक वाजले, सुवर्णा गावस, अश्विनी दीपक हांडे, दीप्ती वायकर पोटनीस, राजराजेश्वरी अनिल रेडकर, विनया विष्णू सावंत, विजय सुधाकर म्हाडिक, रुपल राजेश कुसाळे यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages