मुंबई रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी; १,६६५ चोरीचे मोबाईल मालकांना परत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2026

मुंबई रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी; १,६६५ चोरीचे मोबाईल मालकांना परत


मुंबई | जेपीएन न्यूज - 
मुंबई लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रवाशांचे चोरीला गेलेले तब्बल १,६६५ मोबाईल फोन शोधून काढत त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत ₹२,४७,७५,००० (दोन कोटी ४७ लाख ७५ हजार रुपये) इतकी आहे.

लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर येथील लोहमार्ग पोलीस मुख्यालयातील नवरंग सभागृहात आयोजित कार्यक्रमात हे मोबाईल संबंधित फिर्यादींना परत देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत रेल्वे प्रवाशांचे चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. सर्व रेल्वे पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि सायबर सेल यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली.

यावेळी पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे हे मुंबई रेल्वे पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला पोलीस उपआयुक्त सुनीता सांखळे-ठाकरे, पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच सायबर सेलचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS