आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक रमेश शिंदे यांचा ९३ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी नागरी सत्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2026

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक रमेश शिंदे यांचा ९३ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी नागरी सत्कार


मुंबई | जेपीएन न्यूज - ज्येष्ठ साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन, विचार आणि कार्यावर आधारित दुर्मिळ पुस्तकांचे संग्राहक रमेश शिंदे यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त बुधवार, १५ जुलै रोजी गोरेगाव (पश्चिम) येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

"ज्येष्ठ साहित्यिक रमेश शिंदे साहेब अभिष्टचिंतन सत्कार समिती, गोरेगाव" यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सत्कार समारंभ सायंकाळी ७ वाजता मोतीलाल नगर क्रमांक १ येथील श्रावस्ती बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्रात (बेस्ट नगरसमोर, गोरेगाव अग्निशमन केंद्राच्या मागे) होणार आहे.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

रमेश शिंदे यांनी आंबेडकरी साहित्य, इतिहास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा अभ्यास, संशोधन आणि दुर्मिळ ग्रंथसंग्रह जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या नागरी सत्कार सोहळ्यास मित्र, सहकारी, साहित्यप्रेमी, हितचिंतक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्कार समितीने केले आहे.

— JPN NEWS

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS