DATE- 12 March 2012 पालिका रुग्णालयांची दैनावस्था..... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2012

DATE- 12 March 2012 पालिका रुग्णालयांची दैनावस्था.....

DATE- 12 March 2012पालिका रुग्णालयांची दैनावस्था.....
     मुंबईकराना मोफत तसेच अत्यल्प खर्चात आरोग्य सेवा मिळावी म्हणून मुंबई महानगर पालिकेने ठिकठिकाणी पालिकेची रुग्णालये सुरु केली आहेत. या रुग्णालयाचा लाभ घेण्यासाठी सामान्य व गरीब मुंबईकर मोठ्या आशेने येत असतात परंतु पालिकेच्या रुग्णालयातून मिळणाऱ्या सोयी सुविधा बघितल्यावर रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना झक मारली आणि पालिका रुग्णालयात आलो असे बोलण्याची वेळ येत आहे. 
     पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात रुग्णांना वेळेवर बेड शिट बदलून दिल्या जात नाहीत, फाटलेल्या बेड शिट दिल्या जातात, एखाद्या रुग्णाला घरी पाठवल्यास त्याचे बेड शिट दुसऱ्या रुग्णाला वापरायला दिले जाते, बाथ रूम शौचालये यांची स्वच्छता ठेवली जात नसल्याने कित्तेक शौचालये चोक अप झाली आहेत, वार्डच्या आतील बाजूस झाडू मारून लादी साफ करून स्वच्छता असल्याचे दाखवण्यात येत असताना रुग्णालयाच्या आतील व बाहेरील बाजूस मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने तसेच एखादा रूग्ण मृत्यू पावल्यास त्याचा मृतदेह आठ ते दहा तास वार्ड मध्ये ठेवल्याने इतर रुग्णांना याचा संसर्ग होऊ शकतो याकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असते.
     वार्ड बॉय, सफाई ,एक्सरे, बाह्य रुग्ण नोंदणी या विभागातील कर्मचाऱ्याकडून रुग्णांच्या नातेवाईकांना अरेरावी करून बोलले जाते, रुग्णाला वार्ड मधून एक्सरे, ई सी जी किवा इत्यादी चाचण्या करावयाच्या असल्यास वार्ड बॉय सोबत पाठवण्यास टाळाटाळ केली जाते व नातेवायकानाच रूग्णासोबत पाठवले जाते. रुग्णालयातील जुन्या ओ पी डी जवळ रक्त तपासणी ल्याब आहे. येथे असलेले शौचालय बन्द करून ठेवलेली आहेत या मुळे रक्त तपासणी  करण्यास  येणाऱ्या  रुग्णांना शौचालयाची  येथे सोय  नाही. रुग्णालय परिसरात कुत्रे मांजरी अशा प्राण्याचा सूळसुळाट असल्यानी त्यांनी केलेल्या घाणी मधून मार्ग काढत रक्त तपासणी करायला यावे लागते. 
      रक्त चाचणी ल्याब जवळ पाण्यासाठी पाणपोई सोय असली तरी या पाणपोईची अवास्त दयनीय असून १ नाला चालू आहे तर बाकी ४ नळ बन्द व १ नळ तुटलेल्या अवस्तेत आहे यामुळे रक्त तपासणी साठी येणाऱ्या रुग्णांना येथे पाण्याची सुद्धा सोय नाही. या सर्व प्रकारामुळे रुग्णांना रुग्णालयामध्ये त्रास सहन करावा लागतो.
 
      असेच प्रकार शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाहायला मिळत आहेत. राजावाडी प्रमाणे येथेही अस्वच्छता असते.वरिष्ठ डॉक्टरांनी पेशंटची परिस्थिती गंभीर आहे असे सांगितले तरी वार्ड मधील बेड खाली करण्यासाठी वार्ड मधील डॉक्टरांचा प्रयत्न असतो. रात्रपाळीतले डॉक्टर तर पेशंटला तपासायचे सोडून आपले वार्ड सोडून इतर वार्डमध्ये नर्स बरोबर गप्पा मारताना आढळतात. असे कित्तेक अनुभव पालिकेच्या रुग्णालयात मुंबईकरांना अनुभवयास मिळत आहेत. जोपर्यंत एखाद्या रुग्णाची चांगली काळजी घ्या असे नगरसेवक, आमदार, महापौर, यांच्या कडून सांगितले जात नाही तो पर्यंत रुग्णांची योग्य काळजी घेतली जात नाही. ज्याचा वशिला मोठा नसेल अश्या रुग्णांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते.
      एकीकडे रुग्णालयांच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च केले जात असताना रुग्णांना मात्र चागली सुविधा मिळताना दिसत नाही. कितीही खर्च केला तरी मिळणारी सेवा सुमार दर्जाची असल्याने पालिकेने ज्या सेवाभाव वृत्तीने पालिकेची रुग्णालये सुरु केली त्याप्रमाणे येथे सेवा मिळत नसल्याने नवनिर्वाचित महापौर सुनील प्रभू व उप महापौर मोहन मिठबावकर मुंबईकरांना पालिकेच्या रुग्णालयात चांगली सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील का असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात आहे.
   
अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३ 
ई मेल-jpnnews100 @gmail.com

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS