DATE- 5 March 2012 ‘मंकी मॅन’ व "चड्डी बनियन टोळी"च्या अफवेचा कहर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2012

DATE- 5 March 2012 ‘मंकी मॅन’ व "चड्डी बनियन टोळी"च्या अफवेचा कहर


DATE- 5 March 2012
‘मंकी मॅन’ व "
चड्डी बनियन टोळी"
च्या अफवेचा कहर
मुंबईत सध्या मंकी मॅनच्या अफवेमुळं नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या अफवेमुळं नागरिकांची झोप उडाली आहे. पोलिसांनी या अफवेवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. तरीही या मंकी मॅनच्या भीतीमुळे मुंबईकर जागता पाहारा देत आहेत. विशेष बाब म्हणजे मुंबईच्या उपनगरात व झोपडपट्टी असलेल्या विभागामधून या मंकी मॅनच्या अफेवेचे पेव फुटले आहे. परंतु यामुळे लहान मुलं आणि महिला यांच्यात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.   
       मंकी मॅन आणि चड्डी बनियान टोळीच्या अफवांतून चोर सोडून भलत्याच लोकांना मारहाणीचे प्रकारही वाढले आहेत. 
ठाणे, मुलुंड भागात काही दिवसांपूर्वी मारहाणीच्या अशाच घटना घडल्या.दहशतीखाली असलेले नागरिक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देतात आणि रात्र-रात्र जागून काढत आहेत. अशाच वेळी कोणी अनोळखी व्यक्ती दिसली तर चोर समजून त्याला बेदम मारहाण केली जाते. मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी अशाच काही व्यक्तिंना मारझोड करण्यात आली. चड्डीवर असलेल्या कामगाराला चड़्डी-बनियान टोळीचा सदस्य समजून नागरिकांनी बेदम मारलं, पण नंतर तो सामान्य कामगार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे अनोळखी व्यक्ती एखाद्या परिसरात दिसली आणि त्या व्यक्तीचा संशय आला तर त्याला बेदम मारहाण करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे अनेकदा निष्पांपांना या अफवेतून रोषाचे बळी ठरावं लागत आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगणं गरजेचं बनलं आहे. तसंच संशयास्पद व्यक्ती दिसली तर तिला पकडून पोलिसांकडे देणं हाच योग्य पर्याय ठरू शकतो, तसेच मुंबई मध्ये ज्या विभागात झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे अशाच ठिकाणी या अफवा पसरवल्या जात आहेत. एखादी चड्डी बनियान टोळी असेल किवा मंकी मॅन असेल तर इमारती मधील लोकांना का त्रास दिला जात नाही. फक्त बैठ्या प्रकारच्या झोपडपट्ट्यामध्येच तो लोकांना का घाबरवले जाते असा प्रश्न उपस्थित होतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आज पर्यंत या मंकी मॅन किवा चड्डी बनियान टोळीला कोणीही स्वतः बघितलेले नाही.   
   या अफवेमुळे उपनगरवासीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली असल्याने अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचे करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांनी दिले आहेत. या मंकी मॅनची पहिली अफवा भांडुप आणि घाटकोपर परिसरात पसरली. मात्र येथे अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केल्यानंतर हा प्रकार बंद झाला. त्यानंतर अंधेरी भागात ह्या ‘मंकी मॅन’ची अफवा पसरली. तर आता हीच अफवा कांदीवली आणि मालाड भागातही पसरली आहे. 
   पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे की, ही एक अफवा आहे नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अफवेमुळेच अनेकांचे फावते त्यामुळे नागरीकांना भिऊन न जाता सर्तक राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. दरम्यान, मंकी मॅनच्या अफवा पसरवणारी टोळी असू शकते, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुण्यात संशय व्यक्त केला आहे. पोलीस या टोळीचा छडा लावतील असं त्यांनी सांगितलं आहे. 
   तर मुंबई महानगर पालिका व इतर महापालिकाच्या निवडणुका जवळ आल्या असतानाच अचानक चड्डी बनियन टोळीच्या अफवांनी नागरिक पुरते दहशतीखाली होते. परंतु जशी निवडणूक संपली आणि निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तशी ही अफवा बंद झाली आता सर्व महानगर पालिकेमध्ये महापौर आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष, सभापतींची निवड होणार आहे त्याचवेळी मंकी मॅनची अफवा पसरत आहे. 
   विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे मंकी मॅन म्हणा किवा चड्डी बनियन टोळीची अफवा ही फक्त झोपडपट्टी असलेल्या विभागात जास्त आहे. झोपडपट्टी असलेल्या जमिनी करोडो रुपयांच्या असून या जमिनीवर अनेक बिल्डर लोकांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत या अफवा मागचे नेमके कारण काय याचा विचार मुंबईकरांनी करणे गरजेचे आहे...........

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS