DATE- 30 January 2012 आचारसंहितेची `ऎशी तैशी' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2012

DATE- 30 January 2012 आचारसंहितेची `ऎशी तैशी'


DATE- 30 January 2012
आचारसंहितेची `ऎशी तैशी'
3 जानेवारीला महानगर पालिकेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा निवडणुक आयोगाकडून झाल्यावर त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झाली.आचारसंहितेत कोणत्याही राजकीय पक्षांना, नेत्यांना मतदारांवर पभाव पडेल असे कोणतेही वक्तव्य करता येत नाही. राजकीय पक्षांना उमेदवारांना आपले पक्षाचे चिन्ह, कटआऊटस, बॅनर्स, झेंडे काढावे लागतात. पालिकेच्या हद्दीत महापौर व उपमहापौर यांना लाल दिव्याची गाडी वापरण्याची परवानगी आहे.
अशीच लाल दिव्याची गाडी घेऊन मुंबईच्या महापौर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित वार्तालाप कार्यकमास  आल्या होत्या.  आचारसंहिता असताना लाल दिव्याची गाडी घेऊन कोण आले हे पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा या गाडीकडे लागल्या होत्या. या गाडीमधून मुंबईच्या महापौर उतरुन पत्रकार संघात वार्तालाप कार्यकमात गेल्या हा वार्तालाप कार्यकम संपेपर्यंत ही लाल दिव्याची गाडी तास ते दिडतास पत्रकार संघाच्या आवारात उभी होती.
 महापौरांनी लाल दिव्याची गाडी आणल्याची बोंबाबोंब होताच महापौर गाडीकडे जात असतानाच छायाचित्रकारांनी फोटो काढून वृत्तपत्रात पसिध्दही केले. महापौरांनी लगेच याबाबत खुलासा करत पत्रकास संघ हे पालिकामुख्यालयाकडे येणाच्या मार्गावर असल्याने मी या गाडीचा वापर केला असे सांगण्याचा पयत्न केला असला तरी महापौरांनी पत्रकार संघ पालिका मुख्यालयासमोर असल्याने ही लाल दिव्याची गाडी पालिकेत सोडून पत्रकार संघात यायला हवे होते, असे अनेक जानकारांचे म्हणणे आहे. ही लाल दिव्याची गाडी पत्रकार संघात आणून महापौरांनी आचारसंहितेचा भंग केला असे म्हटले जात आहे.
पालिका आयुक्तांनी याबाबत `मी वृत्तपत्रातून वाचले आहे, माझ्याकडे अशी कोणतीही तकार आलेली नाही, कोणी जर तकार केली तर विचार करुन नक्कीच कारवाई करु' असे पत्रकार परिषदेत सांगीतले. याचवेळी मुंबईमधील राजकीय पक्षांचे सर्व झेंडे, कटआऊटस्, बॅनर, दिसत आहेत. काही राजकीय पक्षांची पुरस्कृत मंडळांच्या फलकावर राजकीय पक्षांची चिन्ह दिसत आहेत. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे.
 आचारसंहिता सुरु असतानाच काही निवडणुकींपासून राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून पैसे काढून हळदीपुंकू संभारंभ, देव - देवतांच्या पुजा आयोजीत केल्या जात आहेत. मुंबईमध्ये तर अशा हळदीपुंकू समारंभ व पुजांचे पेव फुटले आहे. असा  कोणत्या ना कोणत्यामार्गाने आचारसंहिता भंग केला जात आहे. परंतु निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकाऱयांचे दुर्लक्ष होत असल्याने आचारसंहितेची 
`ऎशी तैशी'  झाल्याचे दिसत आहे.
अजेयकुमार जाधव
9969191363
http://www.mahanayakonline.com/brandnews.aspx?bid=1383

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS