DATE- 16 January 2012 उमेदवारांची बंडखोरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2012

DATE- 16 January 2012 उमेदवारांची बंडखोरी


DATE- 16 January 2012
उमेदवारांची बंडखोरी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा महानगरपालिकेवर आपली सत्ता यावी म्हणून सर्वच राजकीय पक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. पालिकेत सध्या 17 वर्षे सत्ता असलेल्या युतीतील शिवसेना 135, भाजपा 63, रिपाई आठवले 29 जागा महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहे. आघाडीच्यावतीने काँग्रेस 169, राष्ट्रवादी 58 जागा लढवणार आहे. तर डाव्या आघाडीतून रिपब्लिकन पक्षाचे सर्वच गट बाहेर पडल्यानंतर उरलेले राष्ट्रीय समाज पक्ष 50, जनता दल 15, शेतकरी कामगार पक्ष -4 कम्युनिष्ट पक्ष 40 जागा, समाजवादी पक्ष स्वबळावर 165 जागा, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वच्या 227 जागा स्वबळावर लढवणार आहे.
सर्व महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना जागा वाटपामुळे पभाग वाटपामुळे महायुती, आघाडीसह सर्वच पक्षात स्थानिक नेते व कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसत आहेत. महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या आठवले गटाला 29 जागा सोडण्यात आल्या आहेत. रिपाईला काँग्रेसची जास्त ताकद आहे, मुस्लिमांची मतदार संख्या जास्त आहे. तसेच मागील पाच वर्षे ज्यांच्या पाठींब्यावर सत्ता उपभोगाची असे अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे दोन पभाग सोडण्यात आले आहेत.
मागासवर्गीयांची ताकद असलेले मुलुंड, भांडूप, विकोळी, वरळी, बोरीवली, कुलाबा येथील पभाग रिपाईच्या वाट्याला न आल्याने दिपक निकाळजे, बहुजन विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते नाराज असल्याने पभाग कमांक 112 कन्नवार नगर, 144 सिध्दार्थ नगर, 111, 98, 105, 104, 190,110 महेंद्र साळवे, 8 संदिप केदारे, 126 संदिप तोरणे, 226 विशाल गायकवाड, 223 पदीप जाधव, 107 सचिन बनसोडे, 195 घनश्याम चिरणकर किंवा सुनिल जाधव यांच्याकडून बंडखोरीच होऊ शकते.

महायुतीमधील भाजपामध्येही 134 प 192 पभाग सेनेला सोडल्याने पचंड नाराजी आहे. ही नाराजी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी  चेंबुरमध्ये स्वतच्या पक्षाची कार्यालये तोडून व्यक्त केली आहे. तिकीट व पभाग वाटपात गडकरी गटाचा पभाव असल्याने इतर गटामध्ये नाराजी आहे. आमदार पकाश मेहता यांनीही पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच पाहता महायुतीमध्ये पभाग व तिकीट वाटपावरुन तसेच दुसऱया कमांकावर असलेले सेना भाजपाचे पभाग रिपाईच्या आठवलेंना सोडल्याने स्थानिक सेना भाजपाचा पचंड असंतोष आहे. हा असंतोष निवडणूकीत व्यक्त होणार असल्याने महायुतीला बंडखोराच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
अशीच परिस्थिती आघाडीची आहे. काँग्रेसमध्ये पभाग व तिकिट वाटपावरुन गुरुदास कामत गट नाराज आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक मोठ्या पमाणात असल्याचे ज्यांना तिकीट मिळणार नाही ते बहुतेक करुन अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार असल्याने आघाडीकडून शेवटच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे समजते. तरीही आघाडीलाही मोठ्या पमाणात बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान रिपाईच्या गवई गटाला अद्याप काँग्रेसने विचारात घेतले नसल्याने गवई गट नाराज आहे. पा.कवाडे यांच्या गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 24 जागांची मागणी केली आहे. खोरिपवाल्यांना राष्ट्रवादीने पाच टक्के जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. डेमोकोट्रीक बरोबर सध्या नुसती बोलणी सुरु आहे. यामुळे आघाडीकडून रिपाईच्या गटांना शेवटपर्यंत नेहमीपमाणे झुलवत ठेवले जाणार आहे.

अजेयकुमार जाधव
9969191363
http://www.mahanayakonline.com/brandnews.aspx?bid=1336

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS