DATE- 23 January 2012 नाराजीचे वगनाट्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

DATE- 23 January 2012 नाराजीचे वगनाट्य

Share This
DATE- 23 January 2012नाराजीचे वगनाट्य
16 फेब्रवारीला होणाऱया मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी राजकीय पक्षांची महायुती  झाली असून या जागावाटपावरुन मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. रिपाइं हा बौध्द व मागासवर्गीय यांचा पक्ष म्हणून ओळखतला जातो. मागासवर्गीयांची मतदारांची संख्या असलेल्या जागा असे प्रभाग  देण्याचे जाणिवपूर्वक टाळले असल्याने रिपाइंमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते  व पदाधिकारी नाराज झाले आहेत.
रिपाइंचे घटक असलेले पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे नाजारींचे नाट्य गेल्या आठवड्यात संपुर्ण महाराष्ट्राने पाहीले. ढसाळ यांनी 5 जागा हव्या असून त्यापैकी दोन जागा रिपाइंने देऊन नाराजी दूर करण्याचा पयत्न केला असता तरी आणखी तीन जागा शिवसेनेच्या कोट्यातून मिळवावेत असे ठरवण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत यांनी स्पष्ट शब्दात नाराजी असल्याचे सांगून शिवसेनेने मला भरलेले ताट देण्याचे आश्वासन अद्यापी पुर्ण केले नसल्याचे म्हटले आहे. यांच्या राजीनाम्या नाट्यवेळी आठवले यांच्यापेक्षा उध्दव ठाकरे हे विश्वासार्थ असल्याचे बोलणाऱ्या ढसाळ यांनी दोन जागा पदरात पडल्यावर शिवसेनेवर विश्वास नसल्याचे  सांगत धूमजाव केले.
 रिपाइंचे दिपक निकाळजे यांनीही कन्नमवार नगर व सिध्दार्थ नगर या जागा मिळालेल्या नसल्याने, जोपर्यंत जागा सुटत नाहीत तोपर्यंत नाराजी असणार असे म्हटले आहे. रिपाइं पमुख पदाधिकारी असलेल्या ऍड. नैना खराटे, अभया सोनवणे, आशा लांडगे, यांनी नाराजी व्यक्त केली. दैनिक महानायकशी बोलताना पक्षांत इतके वर्षे मेहनत घेऊनही पक्ष तिकिट देत नसल्याने आशा लांडगे या भाऊक झाल्या होत्या. पक्षाकडून जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याने त्यांना तर अक्षरक्षा रडू आले होते. पभाग कमांक 25 मधून निवडणूक लइच्छिणाऱया सुमन उघडे यांनी तर रिपाइं कार्यालयासमोर आपल्या समर्थकांसह जुन्या कार्यकर्त्यांचा विचार झालाच पाहिजे अशा घोषणा देत निदर्शने केली होती.
रिपाइंची संघटना असलेल्या बहुजन विद्यार्थी परिषदेनेही त्यांना हवे असलेले पभाग सुटले नसल्याने बंडखोडीचा इशारा दिला आहे. बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी  `दैनिक जनतेचा महानायक'शी बोलताना मला अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेच्या उमदेवारांच्या विरोधात उभे राहण्यास सांगितले आहे. मी जर तिथून जिंकलो तर माझा गेम केला जाईल, मला आजही कांजूरमार्ग विभागात रहायचे आहे. या विभागात आजही गवळींच्या लोकांचे प्रस्थ आहे म्हणून मी या विभागातून निवडणूक लढवणार  नसल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.
यासर्व प्रकारावरुन महायुतीच्या गोटात गेलेल्या रिपाइंला येणाऱया निवडणूकीत मोठा फटका बसेल अशी चिन्ह दिसून येतात. काँग्रेसचे मागासवर्गीय विभागाचे गणेश कांबळे हे सुद्धा तिकीट वाटपावरून नाराज आहेत. काँग्रेस फक्त मागासवर्गीय जनतेचा वापर रॅली, मोर्चे यांनी गर्दी जमवण्यासाठी करते मात्र तिकीट द्यायची वेळ येते.  त्यावेळी मागासवर्गीय जनतेला कार्यकर्त्यांना काँग्रेस बाजूला करुन इतरांना तिकीट देते. काँग्रेसमधून नाराज कार्यकर्ते येत्या आठवड्यात राजीनाम्याच्या तयारीत आहेत.
 असेच नाराजीचे प्रकार  भाजपामध्ये ही असून राज पुरोहीत , पकाश मेहता हे नाराज आहेत. शिवसेनेमध्येही महापौर श्रध्दा जाधव यांचे पुत्र पवन जाधव यांना तर बेस्ट समितीचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांना वरळीचा पभाग ,. श्रध्दा जाधव यांना मंगेश सातमकर यांचा पभाग सोडण्यावरुन पचंड नाराजी पसरली आहे. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी,  सेना, भाजपासारख्या सर्वच पमुख पक्षांना नाराजी येत्या निवडणूकीत भोवणार असून ही नाराजी थांबवण्यात हे राजकीय पक्ष व त्यांचे नेते अपयशी ठरल्यास येणाऱया पालिका निवडणूकीत या नाराजीचा मोठा फटका राजकीय पक्षांना नक्कीच बसेल. 
अजेयकुमार जाधव
9969191363
http://www.mahanayakonline.com/brandnews.aspx?bid=1358

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages