DATE- 9 January 2012 मतांसाठी सरकारचे खोटे नाट्य पालिका निवडणूक - 2012 - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2012

DATE- 9 January 2012 मतांसाठी सरकारचे खोटे नाट्य पालिका निवडणूक - 2012


DATE- 9 January 2012 
मतांसाठी सरकारचे खोटे नाट्य 

पालिका निवडणूक - 2012 

महाराष्ट्रातील निवडणूक विभागाने निवडणूकांच्या तारीख घोषीत करताच निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. निवडणूक विभागाने घोषित केल्यापमाणे मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपुर या महानगरपालिकांतील 1244 जागांसाठी 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.   तर ठाणे, रायगड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातुर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली या जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱया पंचायत समितीच्या निवडणूका 7 फेबुवारीला होत असून जिल्हा परिषदेच्या 1641 जागांसाठी तर पंचायत समितीच्या 3252 जागांसाठी मतदान होणार आहे.  पथमच महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार महानगरपालिकांमध्ये 642, जिल्हा परिषांमध्ये 826, तर पंचायत समितीमध्ये 1626 जागा महिलांसाठी आरक्षीत झाल्या आहेत.
महाराष्ट्रात 2014 मध्ये विधान सभेच्या व लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या निवडणूकीकडे मिनी विधानसभा म्हणून पहिले जात आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक पतिष्ठेची केली आहे. एकीकडे मुंबई महानगर पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना- भाजपाने आपली सत्ता अबाधीत राहवी म्हणून रिपब्लिकन नेते रामदास  आठवले यांनासोबत घेऊन शिवशक्ती - भिमशक्तीच्या नावाने महायुती स्थापन केली आहे. महायुती स्थापन झाल्यावर काही महिन्यांसाठी महायुतीला मोठे यश मिळेल व या यशाच्या माध्यमातून आठवलेंच्या भिमशक्तीला आपले उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आणता येतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. 
परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाला चैत्यूभूमी शेजारी असलेली इंदु मिलची साडेबारा एकर जागा मिळाली या मागणीसाठी भारीप बहुजन महासंघाचे मुंबई अध्यक्ष तथा रिपब्लिकन सेनेचे पमुख आनंदराज  आंबेडकर यांनी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी इंदू मिलचा ताबा मिळवल्याने आंबेडकरी जनतेला नव्याने नेतृत्व मिळाले आहे. आंबेडकरी चळवळीतील मरगळ नाहीशी होऊन पुन्हा चळवळ सुरु झाली आहे. यामुळे आंबेडकरी जनतेने आपोआपच आनंदराज आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारले आहे. आज संपुर्ण समाज आनंदराज यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या धुर्त नेत्यांना माहित असल्याने व रामदास आठवले हे युतीसोबत गेल्याने आघाडी सरकारने आनंदराज नावाचे नेतृत्व उभे रहावे म्हणून इंदू मिल पकरणात सौम्य भूमीका घेतली होती. 
एकीकडे सौम्य भूमिका घेऊन काँग्रेस राष्ट्रावादीने आंबेडकरी अनुयायांवर कारवाई करण्यास दुर्लक्ष करीत विधीमंडळात इंदू मिलची संपुर्ण जागा राष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचा ठराव पास करुन घेतला. तसेच पधानमंत्र्यांकडून इंदू मिलची जागा मिळवण्यात काँग्रेस राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन पधानमंत्र्यांची तत्वत मान्यता मिळवली.  यामुळे आनंदराज आंबेडकर यांचे आंदोलन यशस्वी करण्यात व रामदास आठवले यांना शह देण्यात काँग्रेस राष्ट्रवादीने पडद्यामागून भूमिका नेते मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या गळाला लागलयाचे चित्र उभे राहिले या सर्वांचा फायदा येत्या निवडणूकीत काँग्रेस राष्ट्रवादीला नक्कीच होणार यात तिळमात्र शंका नाही.  
सध्या आंबेडकरी नेत्यांच्या तश्या बैठकीही आघाडी बरोबर होत आहेत. येत्या काही दिवसात किती आंबेडकरी नेते व पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या गळाला लागले हे चित्र स्पष्ट होईल. या निवडणूकीत आंबेडकरी समाजाची एक गठ्ठा मते काँग्रेस राष्ट्रवादी व त्यांच्यासोबत जाणाऱया आंबेडकरवादी पक्षांना मिळतील यात तिळमात्र शंका नाही तर या निवडणूकीत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढते आहे. मागील निवडणूकीत मनसेचे 7 उमेदवार निवडणूक आले होते. या निवडणूकीत त्यांचे 20 ते 25 उमेदवार निवडून येतील अशीही शक्यता असल्याने येणारी महानगरपालिका त्रिशंकू स्वरुपाची होऊ शकते.
अजेयकुमार जाधव
9969191363

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS