DATE- 19 March 2012खासदारकीची टांग ! दैनिक "जनतेचा महानायक"च्या द्रुष्टीकोन या सदरातून २० फेब्रुवारी २०१२ रोजी निवडणुकीच्या निकालानंतर 'आठवलेंना वापरून दाखवलं.......!' याबाबत लिखाण केले होते आज असेच बोलण्याची वेळ आठवले व त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. महाराष्ट्रातील महानगर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी नंतर रामदास आठवले याना खासदारकी मिळेल अशी हवा निर्माण केली जात होती परंतु राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेने आठवलेंना टांग दिल्याची चर्चा सध्या आंबेडकरी जनतेमधून केली जात आहे. महाराष्ट्रातून विधानसभेतून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा रिक्त जागांसाठी ३० मार्च रोजी निवडणूक होणार आहे. यापैकी मनोहर जोशी यांच्या जागी रामदास आठवले यांना खासदारकी मिळेल अशी चर्चा होती. मुंबई महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपली सर्व ताकत पणाला लावून आठवले यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना व भाजपला आपली मते मिळवून दिली व सेना भाजपचे जवळपास १५ नगरसेवक जिंकून दिले यामुळे सेना भाजापाला सत्तेच्या जवळ जाता आले. साहजिकच सेना भाजपला आठवलेंच्या मतांचा फायदा झाला आणि मुंबई, ठाणे महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर सेनेचा भगवा फडकला.
परंतु सेना भाजपाने आपली मते आठवलेंच्या उमेदवारांना दिलीच नसल्याने आठवलेंचे बहुतेक उमेदवार निवडणुकीमध्ये हरले. आठवलेंनी केलेली मदत पाहता मनोहर जोशींच्या जागी राज्यसभेवर पाठवावे अशी अपेक्षा आठवलेना व त्यांच्या कार्यकर्त्यांची होती. यासाठी मातोश्रीवर बैठकाही झाल्या होत्या. पण मार्च अखेर होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने चिटणीस अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करून, आठवलेंसह मनोहर जोशी यांनाही शिसेनेने चांगलाच धक्का दिला आहे. अनिल देसाईंच्या या निवडीमुळे रामदास आठवले यांची राजकीय गणित बिघडली असल्याने सध्या ते अस्वस्थ झाले असून प्रचंड चिडले आहेत.
एकीकडे आठवले मी महायुती तोडणार नाही असे सांगत असताना राज्यात शिवसेना-भाजप या युतीसोबत जाताना रामदास आठवले यांनी कोणतीही अट घातली नव्हती. रिपब्लिकन मतांचा युतीला महापालिकेत फायदाही झाला. आम्ही शिवसेनेकडे राज्यसभेची जागा मागितली नव्हती. पण त्यांनी ती द्यायला हवी होती. राजकारणात परतफेड करण्याची नितीमत्ता सेनेने दाखवली नाही.
मुंबई महानगर पालिकेच्या १६ प्रभाग समित्यांमध्ये प्रत्येकी दोन असे ३२ सदस्य रिपाइचे स्वीकृत केले जाणार होते तसेच बाजार व उद्यान समितीमध्ये अध्यक्ष पद रिपाइचे एकमेव नगर सेवक सब्बारेड्डी मल्लेश बोरा यांना दिले जाणार होते ही सर्व पदे आम्ही नाकारत असल्याचे रिपाइ नेते अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे यांनी आठवले दिल्लीमध्ये असताना मुंबई मध्ये शनिवारी पत्रकार परिषद घेवून सांगितले आहे.
यामुळे रिपाइच्या नेत्यांकडून बोलून दाखवलेली भावना ही स्वतः रामदास आठवले यांचीच आहे.खासदारकी मिळाली नसल्याने स्वतः रामदास आठवले चिंतीत आहेत त्यांची चिंता व शिवसेनेने खासदारकीची दिलेली टांग याचे भाव पत्रकार परिषदा, मोर्चा व कार्यक्रमातून आठवलेंच्या चेहऱ् यावर नेहमी दिसत असतात.
एकीकडे रामदास आठवले व त्यांचे पदाधिकारी सध्या खासदारकी मिळाली नसल्याने नाखूष असतानाच आठवलेंच्या चुकीच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर खासदारकी गमवायची वेळ आली अशी चर्चा आंबेडकरी जनतेमधून केली जात आहे.
अजेयकुमार जाधव
मो.९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment