DATE- 26 March 2012 मागासवर्गीयांच्या रिक्त पदांबाबत दिशाभूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2012

DATE- 26 March 2012 मागासवर्गीयांच्या रिक्त पदांबाबत दिशाभूल


DATE- 26 March 2012 
मागासवर्गीयांच्या रिक्त पदांबाबत दिशाभूल
   मुंबई महानगर पालिकेमध्ये अ ब क ड अशा चार वर्गामध्ये जवळपास १ लाख २० हजार कर्मचारी काम करत आहेत. यापैकी सहप्रमुख कर्मचारी अधिकारी यांनी १५ डिसेंबर २०११ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांना दिलेल्या माहितीनुसार मागासवर्गीयांचा पालिकेमध्ये  १९ हजार पदांचा अनुशेष बाकी आहे.
    सदर दिलेल्या माहितीत ३० जून २०११ रोजीच्या आकडेवारी नुसार पालिकेच्या अ ब क ड अशा चार वर्गामध्ये सरळसेवा भार्तीद्वारे ८६०४४ पदे मंजूर आहेत त्यापैकी ६५६९८ पदे भरली असून २०३४६ पदे रिक्त आहेत तर एस सी ची २११७, एस टी ची ३१०३, विजे (अ) ची १२४३, एन टी (ब) ची ९६४, एन टी (सी )ची १३७०, एन टी (डी )ची ९८२, एस बी सी ची ८६४, ओ बी सी ची ४१६६ अश्या एकूण १४८३९ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे. 
     तर पदोन्नतीद्वारे २४१०५ पदे मंजूर आहेत त्यापैकी १४८४४ पदे भरली असून ९२६१ पदे रिक्त आहेत. एस सी ची ९१० , एस टी ची १०६९ , विजे (अ) ची ४२७ , एन टी (ब) ची ३२६ , एन टी (सी )ची ५३९ , एन टी (डी )ची ३५८  एस बी सी ची ३४३ अश्या एकूण ३९७२ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे सरळ सेवा व पदोन्नतीद्वारे मागासवर्गीयांचा जवळपास १९ हजार पदांचा अनुशेष बाकी असताना खुल्या वर्गातील कोणत्याही पदांचा अनुशेष बाकी नसल्याचे म्हटले आहे.
     नुकताच पलीक आयुक्त सुबोधकुमार यांनी मुंबई महानगर पालिकेचा सन २०१२ -१३ चा अर्थसंकल्प जाहीर केला. २०११ -१२ या वर्षात २१ हजार कोटींचे बजेट २६ टक्क्यांनी वाढून २६ हजार कोटींवर गेले. या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या भरतीचा अनुशेष असल्याने काही तर्दुद केली असेल वाटले होते. परंतु पालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी अर्थसंकल्प सदर केल्या नंतर पत्रकार परिषदे मध्ये मागासवर्गीयांची इतकी पदे बाकी आहेत हे चुकीचे आहेत, हे आकडे सुद्धा चुकीचे आहेत आमच्याकडे एस सी एस टी आयोग आला होता त्यांनी पाहणी केली आहे पालिकेत मागासवर्गीयांची पदे रिक्त नाहीत हे एस सी एस टी आयोगाच्या निदर्शनात आणले असता त्यांची १०१ टक्के खातरी पटली आहे असे सांगितले.    यावरून एकीकडे पालिकेचे अधिकारी मागासवर्गीयांच्या पदांचा अनुशेष बाकी असल्याचे माहिती अधिकार मध्ये सांगत आहेत तर पालिकेचे आयुक्त असा कोणताही अनुशेष नाही असे सांगत आहेत.या सर्व प्रकारावरून मुंबई महानगर पालिकेच्या प्रशासनाकडून एस सी एस टी आयोग तसेच मुंबईकरांची व विशेष करून मागासवर्गीयांची फसवणूक करत असल्याचे सिद्ध होत आहे.     दरम्यान मागासवर्गीयांच्या पदांच्या अनुशेषाबद्दल मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी 'रिक्त पदांच्या बाबतची माहिती व आकडेवारी मागवून ही पदे कशी भरता येतील, ही पदे भरण्यासाठी काय करावे लागेल हे पाहतो आणि कळवतो' असे सांगितले आहे. यामुळे मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी तरी लवकरात लवकर पाऊले उचलून मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..
अजेयकुमार जाधव 
मो.९९६९१९१३६३ 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS