DATE- 27 Feb. 2012 महायुती सत्ता स्थापनेकडे ........ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2012

DATE- 27 Feb. 2012 महायुती सत्ता स्थापनेकडे ........


DATE- 27 Feb. 2012महायुती सत्ता स्थापनेकडे ........ 
नुकतीच मुंबई महानगर पालिकेची निवडणूक संपन्न झाली असून पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी मुंबईकरांनी शिवसेना भाजपच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. शिवसेनेला ७५ भाजपला ३२ रिपाइ आठवले गटाला १ जागा मिळाली आहे.
महायुतीमधील शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. मात्र, भाजपच्या जागा अनपेक्षितपणे वाढल्या. त्यामुळे आता भाजपचा आवाज वाढणार आहे. महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची मागणी भाजप करत असल्याचे समजते. सध्या आमदार असलेले भाजपचे सरदार तारासिंह नगरसेवक असताना 1999 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर हे पद भाजपला मिळालेले नाही; वेळोवेळी मागणी करूनही शिवसेनेने नकारघंटाच वाजवली होती. मुंबईत २००२  मध्ये भाजपचे ३५  नगरसेवक होते; तेव्हा ९८ नगरसेवकांच्या बळावर शिवसेनेनेच स्थायी समितीचे अध्यक्षपद पटकावले होते. आता, २०१२  मधील निवडणुकीत शिवसेनेची सदस्यसंख्या ८२ वरून ७५ वर आली, तर भाजपने २८  वरून ३२  उडी घेतली आहे.
    सध्या पालिके मध्ये बहुमत  सिद्ध करण्यासाठी शिवसेना भाजप कडून प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी अपक्ष व बंडखोर नगर सेवकांची मनधरणी करण्यात आली आहे.या नगरसेवकांना तुम्ही युतीबरोबर राहिल्यास आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी लागणारा निधी कमी पडू  दिला जाणार नाही, समित्यांचे सदस्य पद दिले जाईल अशी आश्वासने देवून नगरसेवकांचा पाठींबा मिळवला जात आहे. मिळालेल्या माहिती नुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारे ११४ नगर सेवक महायुतीच्या सोबत असून ही संख्या १२० वर नेण्याचे प्रयत्न सेना भाजपकडून केले जात आहेत. यावरून ९ मार्चला महायुती बहुमत सिद्ध करेल याबाबत शंका नाही.
    ९ मार्चलाच मुंबईच्या प्रतिष्ठेच्या अशा महापौर पदासाठी निवडणूक होत असून महापौर पदासाठी शिवसेनेचे सभागृह नेते सुनील प्रभू , स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे , विद्यमान महापौर श्रद्धा जाधव, बागलकर  रेसमध्ये आहेत. श्रद्धा जाधव यांना पुनः मातोश्री वरून महापौर पद दिले जाईल का यात शंका आहे यामुळे राहुल शेवाळे व सुनील प्रभू हे प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. तरीही शिवसेनेच्या नियमा प्रमाणे मातोश्री वरून कोणाचे नाव ठरवले जाईल तोच महापौर होईल.
     शिवसेना महापौर पद, स्थायी समिती, आरोग्य समिती अध्यक्ष पद आपल्याकडे ठेवेल तर बेस्ट चे अध्यक्ष पद ठरल्या प्रमाणे भाजपला मिळणार असून जेष्ट नगरसेवक दिलीप पटेल हे बेस्ट समितीचे अध्यक्ष पद भूषवणार  आहेत.युती मधील दोन्ही पक्ष आपल्या नगरसेवकांना महत्वाची पदे मिळावी म्हणून प्रयत्नशील असताना महायुतीमध्ये नव्याने सहभागी झालेल्या रिपाइला कोणती पदे मिळणार हे अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे.
असे असले तरी सध्या मुंबईकरांनी निवडून दिलेल्या महायुतीद्वारे  लवकरच पाणीपट्टी, बेस्ट वीज व बस भाडेवाड करून गिफ्ट देणार आहे.....
 अजेयकुमार जाधव मो..९९६९१९१३६३    ई मेल - jpnnews100 @gmail .com

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS