मुंबई महापालिकेचे 2,700 कोटी रुपये थकीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेचे 2,700 कोटी रुपये थकीत

Share This
मुंबई महापालिकेचे 2,700 कोटी रुपये थकीत

मुंबई : आशिया खंडात सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेचे या ना त्या माध्यमातून तब्बल 2,700 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास 26 हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या महापालिकेला सध्या थकीत असलेली कोटय़वधीची रक्कम वसूल करण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. पालिकेच्या मालमत्तेचा वापर करणार्‍यांकडून भाडय़ाची रक्कम, कंत्राटदारांकडून दंड आणि अतिरिक्त देयके तसेच विकासकांकडून प्रीमियम या विविध माध्यमांतून पालिकेचे 2,700 कोटी रुपये येणे बाकी असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

महापालिकेतील मुख्य लेखा परीक्षकांच्या विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचे मार्च 2012 पर्यंत 2,700 कोटी रुपये थकले आहेत. पालिका प्रशासनाकडून ही रक्कम पाणीटंचाईची समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून बोगद्यांच्या बांधकामासाठी वापरली जाऊ शकते. त्याचबरोबर शहरातील विविध बांधकाम प्रकल्पांसाठीही त्या रक्कमेचा वापर होऊ शकतो, असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्य लेखा परीक्षकांच्या विभागाने अलिकडेच स्थायी समितीच्या बैठकीत अहवाल सादर केला आहे. पालिका प्रशासन सध्या मुख्य लेखा परीक्षकांचा विभाग बंद करण्याची योजना आखत असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages