दोन तिबेटियन भिक्खूंचे आत्मदहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2012

दोन तिबेटियन भिक्खूंचे आत्मदहन


दोन तिबेटियन भिक्खूंचे आत्मदहन
बीजिंग : तिबेट राष्ट्रातील धार्मिक स्वातंर्त्य व संस्कृती पायदळी तुडविली जात असल्याने चीन सरकारच्या निषेधार्थ भिक्खूंच्या आत्मदहनाचे सत्र अजूनही सुरू आहे. आणखी दोन तरुण भिक्खूंनी आत्मदहन करून जीवनयात्रा संपवली असून त्यातील एकाचे 19 तर दुसर्‍या तरुणाचे वय 17 आहे. सिचुआन प्रांतातील तिबेटबहुल असलेल्या नगाबा भागात ही घटना घडली असून, 2009 पासून आतापर्यंत आत्मदहन केलेल्यांची संख्या 51 वर गेल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात लंडन येथील प्री तिबत्त ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार 1950 पासून तिबेट राष्ट्रावर चीन सरकारकडून सक्ती केली जात आहे. या राष्ट्रातील धार्मिक स्वातंर्त्य व संस्कृती या सरकारकडून पायदळी तुडविली जात असल्याचा आरोप तिबेटकडून होत आहे. तर दुसरीकडे या राष्ट्राचा आम्ही सर्वागीण विकास करत आहोत, असा दावा करून भिक्खूंना आत्मदहन करण्यास तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा हे प्रवृत्त करीत असल्याचे चीन सरकारने म्हणणे आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS