पुरातन वास्तूंबाबतच्या सूचना मागवण्याची मुदत एक महिन्याने वाढवा - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2012

पुरातन वास्तूंबाबतच्या सूचना मागवण्याची मुदत एक महिन्याने वाढवा - महापौर

पुरातन वास्तूंबाबतच्या सूचना मागवण्याची मुदत एक महिन्याने वाढवा - महापौर
मुंबई : पुरातन वास्तूंचे जतन आणि संवर्धन व्हावे, याकरिता राज्य शासनाने माजी महानगरपालिका आयुक्त व्ही. रंगनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीने पुरातन वास्तूंचे जतन आणि संवर्धनासंदर्भात नागरिकांकडून मागविलेल्या सूचना व हरकती यांची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2012 पर्यंत आहे. या तारखेत आणखी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी सूचना मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी केली आहे. मुंबई शहराला स्वत:चा एक ऐतिहासिक वारसा असून या शहरामध्ये अनेक गॉथिक शैलीच्या ऐतिहासिक वास्तू अस्तित्वात आहेत. देशाच्या व्यापारी केंद्राबरोबरच एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांचे आकर्षण या मुंबई शहराला आहे ते येथील पुरातन वास्तूंमुळेच. त्यामुळे अशा वास्तूंचे जतन आणि संवर्धन यासंदर्भात या समितीने नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. तसेच या सूचना व हरकती मागवण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2012 पर्यंत असून अद्यापि बरेच नागरिक याबाबत अनभिज्ञ असल्याचे मत महापौर सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे. त्यामुळे सूचना व हरकती मागवण्याची मुदत एक महिन्याने वाढवावी, अशी मागणी महापौरांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS