30 लाख दावे निकालाच्या प्रतीक्षेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2012

30 लाख दावे निकालाच्या प्रतीक्षेत

30 लाख दावे निकालाच्या प्रतीक्षेत

राज्यातील न्यायालयांत जुलैअखेरीस प्रलंबित असलेल्या याचिकांची संख्या 30 लाख, तर मुंबईतील प्रलंबित याचिकांची संख्या सहा लाख 30 हजार होती. मुंबईबाहेरील न्यायालयांत 24 लाख 13 हजार याचिका न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 
  उच्च न्यायालयाने राज्यातील न्यायालयांच्या या वर्षातील सहामाही कामाचा आढावा घेतला. त्यानुसार राज्यातील न्यायालयांत 30 लाख 43 हजार याचिका प्रलंबित आहेत. मागील दोन वर्षांत सुमारे 52 लाख याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. मुंबईतील कनिष्ठ न्यायालयांत 10 वर्षापासून प्रलंबित असलेल्या याचिकांची संख्या 66 हजार असून दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दाव्यांची संख्या दोन लाख 53 हजार आहे. 
  धनादेशाशी संबंधित कायद्याखाली राज्यातील प्रलंबित दाव्यांची संख्या तीन लाख 79 हजार, तर मुंबईतील अशा खटल्यांची संख्या एक लाख 23 हजार आहे. राज्यातील न्यायालयांत मागील सहा महिन्यांत सुमारे 12 लाख 37 हजार दाव्यांचा निपटारा झाला आहे. प्रलंबित याचिका त्वरेने निकाली काढाव्यात, असे निर्देश मुख्य न्यायाधीशांनी जिल्हा न्यायालयांना दिले आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS