23 ऑगस्टला एमआर संघटनेची देशव्यापी संपाची हाक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2012

23 ऑगस्टला एमआर संघटनेची देशव्यापी संपाची हाक

23 ऑगस्टला एमआर संघटनेची देशव्यापी संपाची हाक
परदेशी औषध कंपन्या स्वतःचे टार्गेट गाठण्यासाठी एमआरची (औषध विक्रेते प्रतिनिधी) प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यामुळे एमआरच्या देशव्यापी संघटनेने 23 ऑगस्टला संपाची हाक दिली आहे. औषध कंपन्या स्वतःच्या औषधांचे जोरदार मार्केटिंग करण्यासाठी प्रलोभन म्हणून भेटवस्तू डॉक्‍टरांना दाखवितात. त्याचे खापर मात्र औषध विक्रेत्या प्रतिनिधींच्या माथी फोडले जाते. या कामगारांचा उल्लेख "एजंट' असा करून पिळवणूकही केली जाते. कामाचे तास, मिळणारा मोबदला आणि नोकरी देताना केल्या जाणाऱ्या करारात सुसूत्रता आणण्याची गेल्या कित्येक वर्षांची एमआर कर्मचाऱ्यांची मागणी प्रलंबित आहे. 
    याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस हमी मिळालेली नाही. कामगार म्हणून या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्याकडे लक्ष देण्यास शासनास वेळ नसल्याची खंत "ऑल इंडिया एमआर असोसिएशन्स'ने व्यक्त केली आहे. देशातील औषध उद्योगात दीड लाखांहून अधिक एमआर आहेत. 1954 च्या "ड्रग्ज ऍण्ड रेमेडिज ऍक्‍ट'नुसार कोणत्याही वैद्यकीय संस्थेत वा रुग्णालयात जाण्याचा अधिकार आहे; मात्र आता नव्या निर्बंधानुसार या अधिकारावरही गदा आणली जात आहे. त्याचे स्पष्टीकरणही दिले जात नाही. औषध कंपन्या आपल्याच कंपनीच्या औषधांचे मार्केटिंग करण्यासाठी अमुक एक औषध लिहून देण्यासाठी डॉक्‍टरांवर दबाव आणतात. त्यांच्याकडून ते औषध लिहून घेतात. हे केल्याने कंपन्याचे नव्हे, तर एमआरची प्रतिमा मलिन होते. कंपन्यांकडून रुग्णांची, ग्राहकांची आणि कामगारांचीही जी पिळवणूक सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी; तसेच या यंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी देशातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS