मुंबई महापालिकेचे चार हजार कोटी खड्ड्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2012

मुंबई महापालिकेचे चार हजार कोटी खड्ड्यात



मुंबई महापालिकेचे चार हजार कोटी खड्ड्यात
पालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीवर सहा वर्षांत तब्बल 4000 कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत. त्यामुळे आता पाच वर्षांच्या "मास्टर प्लॅन'अंतर्गत पुन्हा हजारो कोटी रुपये खड्ड्यात घालण्याची तयारी महापालिकेने चालवली आहे. 
  महापालिका खड्डेमुक्त रस्त्यांचे गाजर दरवर्षी दाखवते. त्या नावाखाली दरवर्षी शेकडो कोटी रुपये रस्त्यांच्या दुरुस्तीवर खर्च केले जातात. महापालिकेने 2007 ते 2009 या काळात रस्त्यांच्या डागडुजीवर तब्बल 2700 कोटी रुपये खर्च केले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 2011 मध्ये 1000 कोटी रुपयांच्या रस्तेदुरुस्तीचा बार उडवून दिला होता. तरीही रस्त्यांची अवस्था दयनीयच आहे. 
  रस्त्यांची डागडुजी सुरू असतानाच खड्डे बुजवण्यावर महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यातच आता शहरातील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचा "मास्टर प्लॅन' तयार करण्यात आला आहे. जास्तीत जास्त रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS