स्वाईनचे मुंबईत 300 रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

स्वाईनचे मुंबईत 300 रुग्ण


स्वाईनचे मुंबईत 300 रुग्ण
एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या 655 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये तीनशे जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली असून, चार जण दगावले आहेत. 
   नवी मुंबईमध्ये महिनाभरापूर्वी स्वाईन फ्लूचा रुग्ण दगावल्यानंतर या परिसरामध्ये काळजीचे वातावरण होते. मुंबईतही दोन दिवसांत दहापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे संशयित रुग्णांनी स्वाईनची खात्री करून घेण्यासाठी वैद्यकीय चाचणी करावी, असा सल्ला डॉक्‍टर देत आहेत. गेल्या वीस दिवसांत राज्यात स्वाईनच्या शंभरहून अधिक रुग्णांची नोंद झाली. या काळात मुंबईत 70 रुग्ण आढळले. स्वाईन फ्लू नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले असले, तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही. टॉमिफ्लूच्या गोळ्यांनी स्वाईन फ्लू नियंत्रणात ठेवता येतो. पुरेशी काळजी घेतल्यास स्वाईनवर नियंत्रण ठेवणे शक्‍य असल्याचा विश्‍वास डॉक्‍टरांनी व्यक्त केला आहे.  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS