झटपट श्रीमंतीचा स्काय ' वॉक ' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

झटपट श्रीमंतीचा स्काय ' वॉक '

झटपट श्रीमंतीचा स्काय ' वॉक '
मुंबई /  रशीद इनामदार 

Photo0396.jpg  Photo0395.jpg 
      मुंबई  मध्ये वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पादचार्यांना रेल्वे स्थानकाकडे ये - जा करताना वाहने , पदपथावरील दुकाने यांच्या गर्दीतून जाण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून शक्य असेल तिथे स्काय वॉक बांधण्यात आले . यामुळे खरेच पादचार्यांना होणारा त्रास कमी झाला . पावसात हि न भिजता , चिखलाच्या त्रासापासून वाचून या स्काय वॉक वरून चालणं सुकर वाटू लागलं. त्यावरील बाकांवर बसून निवांत गप्पा हि रंगू लागल्या .त्यापैकी विक्रेत्यांनी दुकाने थाटू नये यासाठी सुरक्षा रक्षक हि काही स्काय वॉक वर तैनात केले गेले होते. त्यामुळे अजूनतरी कुठे अशी दुकाने दिसत नाहीत .याला अपवाद विलेपार्ले (पश्चिम ) रेल्वे स्थानकाकडून मिठीबाई महाविद्यालयाच्या दिशेने जाणारा स्काय वॉक . दिवसभर या स्काय वॉक वर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ चालू असते . तरीही जुगाराचा खेळ राजरोस पणे सुरु असतो . तीन पत्त्यांचा हा खेळ दामदुप्पट पैसे मिळण्याच्या आशेने बरेच ये जा करणारे , विध्यार्थी आवर्जून पाहत असतात . आणि त्यानाही मग जुगार खेळण्याचा मोह आवरत नाही . 
      नियमांची पायमल्ली करून हा खेळ राजरोसपणे कुणाच्या वरदहस्ताने तर चालत नाही न अशी शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे ? यामुळे महाविद्यालयात शिकण्यासाठी जाणाऱ्या तरुण पिढी झटपट श्रीमंतीच्या  या स्काय ' वॉक 'वरून  चुकीच्या दिशेने  तर जाणार नाही न ? अशी भीती हि व्यक्त  केली जात आहे .

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS