सामाजिक एकतेवर घाला घालणा-यावर कठोर कारवाईची गरज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

सामाजिक एकतेवर घाला घालणा-यावर कठोर कारवाईची गरज




सामाजिक एकतेवर घाला घालणा-यावर कठोर कारवाईची गरज


आसाममधील हिंसाचाराचे आणि त्यानंतर देशातील विविध भागांमध्ये पुर्वोत्तर राज्यातील नागरिकांच्या स्थलांतराबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली. येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हिंसाचार प्रकरणी दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली. 
    देश सर्वांचा आहे. ज्याला जिथे हवे तो तिथे राहू शकतो. आसाममधील प्रकार लाजिरवाणा आहे. या दंगलींसाठी जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. या हिंसाचारानंतर देशाच्या काही भागात पुर्वोत्तर राज्यातील नागरिकांसोबत ज्या पद्धतीचा व्यवहार होत आहे, त्याचा केंद्र सरकार तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे त्या म्हणाल्या. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS