कॉंग्रेस आमदाराच्‍या पुत्राकडून अभिनेत्री कुनिकाला शिविगाळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

कॉंग्रेस आमदाराच्‍या पुत्राकडून अभिनेत्री कुनिकाला शिविगाळ


कॉंग्रेस आमदाराच्‍या पुत्राकडून अभिनेत्री कुनिकाला शिविगाळ



माजी अभिनेत्री आणि राजकारणात प्रवेश केलेली कुनिका लाल हिने कॉंग्रेसचे आमदार बलदेव सिंह खोसा यांच्‍या पुत्रावर शिविगाळ आणि गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. ओशिवारा पोलिस ठाण्‍यात तिने तक्रार दाखल केली आहे. बलदेव खोसा यांच्‍या पुत्राने शिविगाळ करुन जीवे मारण्‍याची धमकी दिली, असे तिने या तक्रारीत म्‍हटले आहे. दिवंगत कॉंग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्‍या श्रद्धांजली सभेत हा प्रकार घडला.
   प्राप्‍त माहितीनुसार, सभेमध्‍ये कुनिका आणि खोसा यांच्‍या वाद झाला. दरम्‍यान, आमदार खोसा यांनी कुनिकाची माफी मागितली आहे. खोसा यांचा पुत्र सिद्धार्थ याने मात्र सर्व आरोप बिनबुडाचे असून प्रकरणाचा उगाच बाऊ करण्‍यात येत असल्‍याचे त्‍याने म्‍हटले आहे. बलदेव खोसा हे कॉंग्रेसचे अंधेरी येथील आमदार आहेत. कुनिका हीदेखील कॉंग्रेसची आमदार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS