आंदोलनाचा हिशोब मागितला / रामदेव बाबा अडचणीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

आंदोलनाचा हिशोब मागितला / रामदेव बाबा अडचणीत




आंदोलनाचा हिशोब मागितला




रामदेव बाबा अडचणीत


काळा पैसा आणि भ्रष्‍टाचाराच्‍या मुद्यावरून कॉंग्रेस सरकारला घेरणारे योगगुरू रामदेव बाबा अडचणीत आले आहेत. सेंट्रल एक्‍साइज अँन्‍ड कस्‍टम इंटिलिजेन्‍सने रामदेव बाबांना नुकत्‍याच झालेल्‍या आंदोलनाच्‍या खर्चाचा तपशील मागितला आहे. या खात्‍याने रामदेव बाबांच्‍या भारत स्‍वाभिमान ट्रस्‍टलाही नोटीस पाठवली आहे. 
    नोटिशीमध्‍ये रामदेव बाबांना आंदोलनासाठी करण्‍यात आलेल्‍या खर्चाचा तपशील देण्‍यास सांगितले आहे. बाबांचे हे आंदोलन 9 ते 14 ऑगस्‍ट या कालावधीत दिल्‍लीमध्‍ये झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार सेंट्रल एक्‍साईज आणि कस्‍टम विभागाचे अधिकारी गोपनीयरित्‍या आंदोलनात सहभागी झाले होते. बाबांच्‍या आंदोलनासाठी काम करणा-या टीममध्‍येही हे अधिकारी सामील झाले होते. त्‍यांनी आंदोलनाच्‍या तयारीचा आणि खर्चाचा तपशील जमवला. अधिका-यांनी पतंजली संस्‍थेमध्‍ये भक्‍त आणि रूग्‍ण बनून महत्‍वाची माहिती मिळवली. 
     रामदेव बाबांनी ज्‍या-ज्‍यावेळी आंदोलन केले आहे त्‍या-त्‍यावेळी सरकारी एजन्‍सींनी त्‍यांच्‍याविरोधात कारवाई केली आहे. यावेळी एक्‍साईज अँन्‍ड कस्‍टम विभागाने संपूर्ण तयारी करून बाबांच्‍या आंदोलनाशी निगडीत माहिती मिळवली आहे. त्‍यामुळे रामदेव बाबांना या नोटिशीचे उत्तर देणे अवघड जाणार असल्‍याचे मानले जात आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS