मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मुंबईतच पदवी मिळण्याची सोय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मुंबईतच पदवी मिळण्याची सोय


मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मुंबईतच पदवी मिळण्याची सोय

मुंबई – मुक्त विद्यापीठाच्या नोव्हेबर २०१० व मे २०११ या वर्षी बी.ए./बी.कॉम. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ज्यांना पदवी प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही अशा विद्यार्थ्यांना शुक्रवार दि.२४ ऑगस्ट रोजी चेतना महाविद्यालयात सकाळी ११.०० वाजता पदवी प्रदान करण्यात येणार आहे.  
यापूर्वी झालेल्या पदवीदान समारंभासाठी मुंबई शहरातील ३,३३६ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी जे विद्यार्थी नाशिक येथील पदवीदान समारंभात उपस्थित राहू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना मुंबईतच सुलभरीत्या प्रमाणपत्र मिळावे म्हणून विद्यापीठाने शुक्रवार दि.२४ ऑगस्ट रोजी बांद्रा येथील चेतना महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात स्वत: परीक्षा नियंत्रक श्री. दिनेश भोंडे उपस्थित राहून विद्यार्थ्याना पदवी प्रदान करणार आहेत.
विद्यार्थ्यांनी सकाळी ११ ते १ दरम्यान उपस्थित राहून पदवी ग्रहण करावी असे आवाहन विभागीय संचालक डॉ.प्रकाश देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९९६९०१३८८६/९४०३७७४५३४ या भ्रमणध्वनींवर संपर्क साधावा.        

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS