इंटरनेटवरील ब्लॉक केलेल्या पेजेसपैकी २० टक्के मजकूर हिंदू मूलतत्ववाद्यांचा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

इंटरनेटवरील ब्लॉक केलेल्या पेजेसपैकी २० टक्के मजकूर हिंदू मूलतत्ववाद्यांचा

इंटरनेटवरील ब्लॉक केलेल्या पेजेसपैकी २० टक्के मजकूर हिंदू मूलतत्ववाद्यांचा
पाकिस्तानमधले नेटिझन्स वेबसाइट्सवर मुस्लीमांना भडकवणारा मजकूर टाकत असल्याची ओरड होत असताना सरकारने ब्लॉक केलेल्या वेब पेजेसमध्ये हिंदू मूलतत्ववाद्यांनी अपलोड केलेल्या पेजेसची संख्या २० टक्के असल्याचे समोर आले आहे. देशामध्ये जातीय प्रश्नावरुन फूट पडावी असा मजकूर हिंदू मूलतत्ववाद्यांनी टाकल्याचे आढळले असून या संदर्भातली अनेक पेजेसही ब्लॉक करण्यात आली आहेत.
यामध्ये मुस्लीमांनी बोडोंवर अत्याचार केल्याचे दाखवणा-या फेरफार केलेल्या व्हिडीयो क्लिप्स व फोटोंचा समावेश आहे.
अल्पसंख्याकांना लक्ष्य करुन देशात तणाव निर्माण करण्याचा हेतू या मूलतत्ववाद्यांचा दिसून आला आहे. चिनी अतिक्रमणाविरुद्ध आत्मदहन करणा-या तिबेटींचे वर्णन अशा पेजेसवर आसामी हिंदूंवर मुसलमानांनी केलेले अत्याचार असे करण्यात आल्याचे हेट पेजेसचा अभ्यास करणा-या तज्ज्ञांना आढळले आहे. अनेक फोटोंची मागची बाजू हवी तशी बदलण्यात आल्याचेही लक्षात आले आहे.
एवढेच नाही तर देशभरातील ईशान्येकडील नागरिकांना धमकावणारे एसएमएसही हिंदू समूहांनी तयार केल्याचे यावर काम करणा-या संस्थांना आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. अशा एसएमएसेस मुळे हजारोंच्या संख्येने ईशान्येकडील नागरिकांनी बंगळुरू, पुणे व हैदराबादमधून ईशान्येकडे जाणे पसंत केले होते. देशभरात यावरुन गदारोळ झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली तसेच सोशल नेटवर्किंग साइट्सवरुन आक्षेपार्ह मजकूर असलेली पाने ब्लॉक केली.
आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सर्व प्रकारचे मूलतत्ववादी आसाममधल्या हिंसाचाराचा वापर करताना दिसून येत आहेत. बंगळुरूमध्ये ईशान्येकडील नागरिकांविरुद्ध काढलेला तथाकथित फतवा पसरवण्यात उजव्या हिंदू गटांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हैदराबादमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकावल्याचे वृत्त अशा साइट्सवर पसरवण्यात येत होते, परंतु असे आढळले आहे की हे हैदराबाद शहर पाकिस्तानातील आहे.
बोडोंमध्ये आणि एकूणच ईशान्य भारतामध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी हिंदू मूलतत्ववादी प्रयत्नशील असल्याचे आणि त्यादृष्टीने ते बोडोंच्या पाठिशी उभे राहत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS