सरकारने जातीयवाद्यांपुढे गुडघे टेकले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

सरकारने जातीयवाद्यांपुढे गुडघे टेकले


सरकारने जातीयवाद्यांपुढे गुडघे टेकले
पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांच्या बदलीचा निर्णय घेऊन राज्य सरकारने जातीयवाद्यांसमोर गुडघे टेकले असल्याची टीका अवामी विकास पक्षाचे अध्यक्ष समशेरखान पठाण यांनी केली आहे. पटनायक यांनी 11 ऑगस्टला घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचे कौतुक करण्याची गरज आहे. त्यांची झालेली बदली ही शरमेची बाब आहे. बढतीच्या नावावर केलेली बदली चुकीची आहे असेही ते म्हणाले. 
   पटनायक यांच्या बदलीनंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी पठाण बोलत होते. यावेळी सलीम अलवारे, सर्फराज आरजू, एजाज मुकादम, शबाना खान उपस्थित होते. नवे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह हे सर्व समाजाला चांगला न्याय देतील, असा विश्‍वासही पठाण यांनी व्यक्त केला. दोषी व्यक्तींना शिक्षा झालीच पाहिजे; मात्र निरपराधांना विनाकारण त्रास देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. अवामी विकास पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS