दिवसभरात फक्त पाच 'एसएमएस' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

दिवसभरात फक्त पाच 'एसएमएस'


दिवसभरात फक्त पाच 'एसएमएस'


ईशान्य भारतीयांमध्ये घबराट पसरवणा‍ऱ्या 'एसएमएस'वर लगाम लावण्यासाठी शनिवारपासून 'बल्क एसएमएस'वर १५ दिवस बंदी घालण्यात आली असली तरी प्रत्यक्षात तमाम मोबाइल कंपन्यांनी दिवसभरात पाचपेक्षा जास्त एसएमएस पाठवण्यालाच 'मनाई' केली आहे. 
कंपन्यांनी स्वतःहून केलेल्या 'कारवाई'मुळे एसएमएस बहाद्दर आणि कॉलेजिअन्सची अडचण झाली आहे. 
   बल्क एसएमएस म्हणजे एकाच वेळी एकाहून अधिक लोकांना एकच मेसेज पाठवणे. हे बल्क एसएमएस दिवसातून केवळ पाचच पाठवता येऊ लागले आहेत. टेलिकॉम कंपनीच्या हेल्पलाइनवर कॉल करताच 'सरकार कडून आलेल्या सुचनेनुसार आता चोवीस तासातून (दिवसातून) फक्त पाच एसएमएस पाठवण्याची सेवा पुढील पंधरा दिवसांसाठी लागू झाली आहे', अशी रेकॉर्डेड टेप ऐकावला मिळते. ही बंदी सगळ्यांना लागू असली तरी बेंकिंग, रेल्वे आणि आर्थिक संस्थांना या पाच एसएमएसच्या बंदीतून वगळण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS