अफवा पसरविणार्‍या तिघाजणांच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

अफवा पसरविणार्‍या तिघाजणांच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

अफवा पसरविणार्‍या तिघाजणांच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 

विविध रेल्वेस्थानके आणि लोकलमध्ये बॉम्ब फुटणार असल्याचा निनावी दूरध्वनी करून अफवा पसरविणार्‍या तिघाजणांच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मतीन अहमद (२०), नीलांबर पाणीग्रही (४२) आणि प्रवीण भाटिया अशी या तिघांची नावे आहेत.
     अहमद, नीलांबर आणि प्रवीण यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला निनावी फोन करून लोकल आणि रेल्वेस्थानकांवर धमाके होणार असल्याचे सांगून पोलिसांना अक्षरशः कामाला लावले होते. परंतु गेल्या शनिवारी मुंबईत धर्मांध मुस्लिमांनी घातलेला हैदोस पाहून रेल्वे पोलिसांनी त्याचे अधिक गांभीर्य घेतले होते. रेल्वे पोलीस आयुक्त प्रभात कुमार आणि उपायुक्त घन:श्याम भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे (युनिट ४) पोलीस निरीक्षक एन. शेख यांनी हे निनावी फोन करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना शिताफीने अटक केली. 
      शीव येथील शास्त्रीनगर येथे राहणारा अहमद याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून जोगेश्‍वरी स्थानकात बॉम्ब फुटणार असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्या निनावी फोनचा शोध घेऊन चौकशी सुरू केली असता हा फोन वाहीद अन्सारी याच्या नावावर असल्याचे समजले. परंतु अन्सारीने चौकशीत हा फोन अहमद वापरत असल्याचे सांगितले. त्यानंतर अहमदला शनिवारी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे त्याने या महिन्यात तब्बल बारा वेळा नियंत्रण कक्षाला फोन करून अफवा पसरवली होती. दुसर्‍या घटनेत स्वातंत्र्यदिनादिवशी एक व्यक्ती लोकलमध्ये बॉम्ब घेऊन शिरली असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस तपासानंतर नीलांबर पाणीग्रही याला अटक करण्यात आली. 
      लोकलमध्ये एका व्यक्तीसोबत झालेल्या भांडणाचा राग अनावर झाल्याने त्याला फसविण्यासाठी हा फोन केल्याचे चौकशीत त्याने सांगितले, तर तिसर्‍या घटनेत ४ ऑगस्ट रोजी निरनिराळ्या क्रमांकावरून फोन करून छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि कुर्ला स्थानकांदरम्यान १३ साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगणार्‍या जेसीबी चालक प्रवीण भाटिया याला अटक केली. कामावरून काढून टाकल्याच्या रागावरून आपण हे कृत्य केल्याचे त्याने चौकशीत सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS