पोलिस आयुक्त पटनाईक आणि गृहमंत्री पाटील यांनी थोडीशीही लाज असेल, तर राजीनामा द्यावा - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

पोलिस आयुक्त पटनाईक आणि गृहमंत्री पाटील यांनी थोडीशीही लाज असेल, तर राजीनामा द्यावा - राज ठाकरे

पोलिस आयुक्त पटनाईक आणि गृहमंत्री पाटील यांनी 
थोडीशीही लाज असेल, तर राजीनामा द्यावा -  राज ठाकरे 
PHOTOS: मनसेचा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानवरील विराट मोर्चा
     रझा अकादमीने काढलेल्या मोर्चादरम्यान हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ला चढवूनही पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले नाहीत, उलट हल्लेखोरांना अटक करणा-या अधिका-यांनाच शिविगाळ करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक आणि परिस्थिती हाताळण्यात अपयश आलेले गृहमंत्री आर. आर. पाटील यांना थोडी जरी लाज वाटत असेल तर आपापल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आझाद मैदान येथे काढलेल्या मोर्चा दरम्यान केली. 
      या हिंसाचारात पोलिसांचे खच्चीकरण झाले आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग झाला, पोलिसांना मारहाण झाली तरी कारवाईचे आदेश देण्यात आले नाही. उलट हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला पकडणाऱ्या उपायुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अरुप पटनायक लोकांसमोर झापतात. जर पोलिसांचे असेच खच्चीकरण सुरू राहिले तर लोकांनी कुणाकडे जायचे. मी हिंदुत्वाचा पुरस्कार करीत नाही. मला केवळ महाराष्ट्र धर्म समजतो. पोलिसांवर हात टाकणारा कुठल्याही धर्माचा असतो, त्याला फोडून काढलेच पाहिजे.'' आपला हा मोर्चा रझा अकादमीच्या आंदोलनात जखमी झालेल्या पोलिसांना सहानुभूती व्यक्त करण्यासाठीच होता, असे सांगून त्यांनी पोलिसांच्या मनात आपली प्रतिमा ठसविण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून कधीच पोलिसांवर हात उचलला जाणार नाही, असे ते म्हणाले. 
          भिवंडीतील दंगल कुणी केली, असा प्रश्न विचारुन रझा अकादमीवर त्यांनी हल्ला चढविला. तसेच रझा अकादमीला अबू आझमींचा पाठिंबा असल्याचा आरोप केला. परप्रांतातून आलेला अबू आझमी महाराष्ट्रातील दोन-दोन विधानसभा मतदारसंघातून निवडून येतोच कसा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अबू आझमीने मुंबईतील हिंसाचारात मृत्यू पडलेल्या मुस्लिम तरुणाला मदत केली, मग आमच्या पोलिसांना तो मदत का देत नाही. मुंबईतील हिंसाचार हा घुसखोर बांगलादेशी मुस्लिमांनी केला असल्याचे सांगत त्यांनी एक बनावट पासपोर्ट व्यासपीठावर दाखवला. 
       
       बाबरी मशिदीची प्रतिक्रिया मुंबईत उमटली. आता आसाममधल्या दंग्याची प्रतिक्रिया मुंबईनंतर बिहार, झारखंड, लखनऊमध्ये उमटली. काय केले त्यांनी उत्तरप्रदेशात या पाकिस्तानी, बांगलादेशातील मुस्लिमांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमेची विटंबना केली तेव्हा कुठे गेल्या मायावती ?कुठे गेले रामदास आठवले कुठे गेले रा. सु. गवई कुठे गेले प्रकाश आंबेडकर यांना फक्त इंदू मिल दिसते. इंदू मिलच्या जागेवर काय बंगला बांधणार आहात का, असा सवाल त्यांनी केला. रझा अकादमीच्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशाताही अशाच प्रकारचा हिंसाचार झाला. त्यात बुद्धाच्या मूर्तीची बिटंबना झाली, त्याचा कोणत्याही दलित नेत्याने निषेध केला नाही, असे ते म्हणाले.
      राज म्हणाले,"आर. आर. पाटील आणि अरुप पटनायक यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आम्ही मोर्चा काढला आहे. पोलिसांना आणि प्रसार माध्यमांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आम्ही एकत्र उभे राहिलो आहोत. जेव्हा अशा घटना घडतील तेव्हा याच ताकदीने उभे राहायचे आहे. मी जेव्हा केव्हा तुम्हाला हाक देईल तेव्हा तुमचा मला असाच पाठिंबा राहील, अशी आशा करतो.

   भाषण झाल्यावर कॉन्स्टेबल प्रमोद तावडे या पोलिसाने व्यासपिठावर जाऊन राज ठाकरे यांना गुलाबपुष्प भेट दिले. त्यानंतर बोलताना तावडे म्हणाले, की मला कारवाईची भीती नाही. मी स्वयंस्फूर्तीने हे पाऊल उचलले आहे. राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी मी व्यासपिठावर आलो होतो असे तावडे यांनी सांगितले. तावडेना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS