‘महानंद’ सरकारी दूध उपक्रमात आर्थिक अनियमितता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2012

‘महानंद’ सरकारी दूध उपक्रमात आर्थिक अनियमितता

 ‘महानंद’ सरकारी दूध उपक्रमात आर्थिक अनियमितता

संचालकांवर दोन वर्षे सुवर्णमुद्रांची उधळण, शासनाची परवानगी न घेता परदेश दौरा करणा-या ‘महानंद’ या सरकारी दूध उपक्रमात आर्थिक अनियमितता असल्याचे  ताशेरे विशेष लेखा परीक्षणात ओढण्यात आले आहेत. दोषींवर कारवाईची मागणी करणारे राज्याचे दुग्धविकास सचिव तथा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक जयंत गायकवाड यांना अटकाव करण्यात आला. त्यामुळे आपल्याला पदावरून मुक्त करावे, अशी मागणी करणारे पत्र गायकवाड यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे.  
   संचालकांवर सुवर्णमुद्रा उधळून तसेच संचालकांनी केलेल्या परदेश दौ-यात महासंघाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याचेही दुग्ध विभागाने प्रसिद्ध केलेल्या विशेष  लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले. अहवाल प्रसिद्ध होताच ‘महानंद’चे अध्यक्ष सुरेश धस यांनी संबंधित संचालक आणि कर्मचा-यांवर कारवाई न करता केवळ दुरुस्ती अहवाल सादर करावा, असे मत मांडले होते. तथापि, व्यवस्थापकीय संचालक  गायकवाड यांनी नियमाप्रमाणे कारवाई व्हायला हवी अशी भूमिका घेतली. मात्र त्यांच्या मताविरुद्ध घडत असल्याने गायकवाड यांनी आपल्याला पदावरून मुक्त करावे, अशी विनंती करणारे पत्र राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठिया यांना पाठवले आहे.  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS