हिंदू , मुस्लीम, बौध्द धर्मियांनी शांतात पाळावी - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

हिंदू , मुस्लीम, बौध्द धर्मियांनी शांतात पाळावी - रामदास आठवले

हिंदू , मुस्लीम, बौध्द धर्मियांनी शांतात पाळावी - रामदास आठवले
टीका बाबासाहेबांचा अवमान करणारी
मुंबई / अजेयकुमार जाधव 

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी रिपब्लीकन नेत्यांवर केलेल्या आरोपाबाबत बोलताना उत्तर प्रदेश मध्ये बुद्ध मूर्तीची विटंबना मुंबई मध्ये झालेले दंगे याचा आम्ही निषेध केला आहे.आम्ही काय करायचे हे आमच्या पक्षाचा अधिकार आहे.भारतामधील वातावरण बिघडू नये म्हणून आम्ही मोर्चे काढले नाही.असा खुलास रामदास आठवले यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी स्मारकाच्या मुद्द्यावर या नेत्यांवर केलेली टीका बाबासाहेबांचा अवमान करणारी आहे, असा आरोप रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे.
     या षड्यंत्रा मागे पाकिस्तानचा हात आहे का याची चौकशी सी बी आय मार्फत करावी. व दंगे भडकवनारयांवर  कठोर कारवाही करावी अशी मागणी केली. म्यानमार येथे बौध्द धर्मीय व मुस्लीम यांच्यात धार्मिक पातळीवर कोणताही संघर्ष नाही तरीही छायाचित्रांचे विकृतीकरण करून धार्मिक भावना भडकावल्या जात आहेत. यामुळे हिंदू , मुस्लीम, बौध्द धर्मियांनी शांतात पाळावी असे आवाहन आठवले यांनी केले.अशा मोर्चांमुळे वातावरण बिघडवण्याचे काम केले जात असल्याने  या प्रकरणावर मोर्चे काढण्यास पोलिसांनी परवानगी देवू नये असे आठवले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS