आसामात राष्ट्रपती राजवट लागू करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

आसामात राष्ट्रपती राजवट लागू करा


आसामात राष्ट्रपती राजवट लागू करा
आसाममध्ये अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारांना आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई जबाबदार आहेत. त्यामुळे केंद्राने त्यांचे सरकार बरखास्त करावे व राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने आज केली. या वेळी मौलाना अब्दुस सलाम कासमी, राशीद आझीम व बुनई नोएम हसनी उपस्थित होते. 
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाविरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. राज यांना सापडलेला बांगलादेशी पासपोर्ट त्यांनी पोलिसांकडे देण्याची गरज होती, तसेच त्या पासपोर्टची चौकशीची मागणी त्यांनी केली. आसाममध्ये होणाऱ्या अत्याचारांविरोधात 29 ऑगस्टला नवी दिल्ली येथे आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. आझाद मैदानात 11 ऑगस्टचा प्रकार निंदनीय असल्याचेही ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS