अमर जवान स्मारकाची तोडफोड करणारा अटकेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2012

अमर जवान स्मारकाची तोडफोड करणारा अटकेत


अमर जवान स्मारकाची तोडफोड करणारा अटकेत





मुंबईत आझाद मैदानाबाहेर उसळलेल्या हिंसाचारादरम्यान 'अमर जवान' स्मारकाची तोडफोड करणार्‍या  तरुणाला मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, अब्दुल कादीर असे या आरोपीचे नाव असून  पोलिसांनी त्याला जोगेश्वरी भागातून  ताब्यात घेतले. आतापर्यंत या हिंसेप्रकरणी पोलिसांनी 50 जणांना अटक केले आहे. 

आसाम दंगलींच्या निषेधार्थ रझा अकादमीने 11 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतले होते. सभा संपत आली असताना जमावाने सीएसटी भागात जाळपोळ, दगडफेक केली होती. पोलिसांच्या वाहनासह चार बस आणि वृत्त वाहिन्यांच्या ओबी व्हॅन जाळण्यात आल्या होत्या. या हिंसाचारात दोन जण ठार झाले होते. तर 3 पत्रकारांसह 55 जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS