बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबई पालिकेने आर्थिक तरतूद करावी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2012

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबई पालिकेने आर्थिक तरतूद करावी

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबई पालिकेने आर्थिक तरतूद करावी

मुंबई - दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची शिफारस आज स्थायी समिती अध्यक्षांनी महासभेला अर्थसंकल्प सादर करताना केली. 

पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आज महासभेपुढे अर्थसंकल्प मांडला. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी महापालिकेने आर्थिक तरतूद करावी, अशी शिफारस त्यांनी केली. भूखंड मिळविण्याबाबत केवळ चर्चा सुरू आहे. हे स्मारक कोणी उभारावे, याबाबत निर्णय झालेला नाही; मात्र मुंबई महापालिकेने आर्थिक तरतूद करावी, अशी सूचना शिवसेनेने केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. त्यामुळे स्मारकासाठी केंद्राकडून जमीन मिळविण्याचे आव्हान कॉंग्रेसपुढे आहे. महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना युतीत समाविष्ट करून घेणारी शिवसेनाही स्मारकासाठी सरसावली आहे. बाबासाहेबांचे स्मारक महापालिकेने उभारल्यास महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. त्या हेतूनेच शिवसेनेने हा मुद्दा हातात घेतला असल्याची चर्चा सुरू आहे

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS