अरुण गवळीची शिक्षा ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2012

अरुण गवळीची शिक्षा ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर


अरुण गवळीची शिक्षा ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर



शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरविलेला कुख्यात गुंड अरुण गवळी याला सुनविण्यात येणारी शिक्षा ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. 

जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणी मोक्का न्यायालयाने अरुण गवळीसह 12 जणांना हत्येचा कट रचण्याच्या आरोपात गेल्या शुक्रवारी दोषी ठरवले होते. तसेच याबाबत सोमवारी न्यायालय शिक्षा सुनावणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, काल (सोमवारी)ही निकाल जाहीर न करता न्यायालयाने मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, न्यायालयाने आजही शिक्षा न सुनावता यावरील निर्णय ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला आहे. आता येत्या शुक्रवारी (३१ ऑगस्ट) गवळीला मोक्काचे विशेष न्यायालय शिक्षा सुनावेल.

जमिनीच्या वादातून बाळा सुर्वे व साहेबराव भिंताडे यांनी चार वर्षांपूर्वी अरुण गवळी याला जामसंडेकर यांच्या हत्येसाठी 30 लाखांची सुपारी दिली होती. त्यानंतर गवळीने आपल्या हस्तकांकरवी जामसंडेकर यांची असल्फा येथील त्यांच्या घरी हत्या केली. एखाद्या खून खटल्यात दोषी सापडलेला अरुण गवळी हा मुंबईतील पहिलाच 'डॉन' ठरला आहे. न्यायालय त्याला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा देईल, असे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS