वसंत ढोबळेंचे पंख छाटले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

वसंत ढोबळेंचे पंख छाटले


वसंत ढोबळेंचे पंख छाटले


मुंबई - पोलिस आयुक्तपदी डॉ. सत्यपाल सिंग यांची निवड झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच समाजसेवा शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांचे पंख छाटण्यात आले आहेत. समाजसेवा शाखेच्या अधिका-यांनी यापुढे क्राईम ब्रॅंचचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांना रिपोर्ट करावा, असा आदेश सिंग यांनी बजावला आहे. सिंग यांच्या या निर्णयामुळे ढोबळे यांच्या अधिकारांवर आयुक्तांनी अंकुश ठेवला असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

ढोबळे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील विविध पब आणि नाईट क्लबवर छापे टाकून तेथील उच्चभ्रूंवर कारवाई केली होती. ढोबळे यांच्या या कारवाईवर समाजातील काही वर्गांतून टीका करण्यात आली. मात्र, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांनी ढोबळे यांच्या कारवाईचे पूर्ण समर्थन केले होते. ढोबळे याआधी थेटपणे पटनाईक यांना रिपोर्ट करीत होते. 

पोलिसांच्या कारवाईमुळे सामान्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे, यावर सिंग यांचा विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर लगेचच ढोबळे यांना क्राईम ब्रॅंचच्या सहआयुक्तांना रिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 

सिंग यांच्या या आदेशामुळे उच्चभ्रू वर्गातील तरुणांना आणि नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या मंगळवारी आझाद मैदानात घेतलेल्या सभेतही ढोबळे यांच्या कारवाईवर हल्ला केला होता.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS