कोहिनूरपाठोपाठ राज यांचा इंदू मिलवरही डोळा -अविनाश महातेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

कोहिनूरपाठोपाठ राज यांचा इंदू मिलवरही डोळा -अविनाश महातेकर


कोहिनूरपाठोपाठ राज यांचा इंदू मिलवरही डोळा -अविनाश महातेकर


कोहिनूर मिलपाठोपाठ दादरच्या इंदू मिलच्या जमिनीवरही मनसेचे नेते राज ठाकरे यांचा डोळाअसल्याचा आरोप करत इंदू मिलच्या जागेवर राज यांना बंगला बांधायचा आहे का असा सवालरामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकरयांनी गुरुवारी येथे केला 
इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीयस्मारकाची टिंगलटवाळी राज ठाकरे यांच्याकडून होत असून त्यात त्यांची स्मारकाबाबतची आस्थादिसते अशी कोपरखळी महातेकर यांनी मारली आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते गरीब असतील .पण ज्या जागा त्यांनी बुद्धविहारासाठी राखून ठेवल्या तिथे बुद्धविहारच बांधले आहेत स्वतःचे घरनव्हे असा टोला महातेकर यांनी हाणला 
मनसेला बौद्धांची मते हवी आहेत मग बौद्धांचे आदर्श असलेल्या बुद्ध मूर्तीची विटंबना झाली तरराज ठाकरे प्रतिक्रिया का देत नाहीत ती आरपीआयच्या नेत्यांनीच दिली पाहिजे अशी चिथावणी तेका देतात त्यांना बौद्ध व मुस्लिम समाजात भांडणे लावायची आहेत पण त्यांच्या मनसुब्यालाआंबेडकरी जनता बळी पडणार नाही असे महातेकर म्हणाले 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS