आर.आर.पाटील यांना खातेच समजत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

आर.आर.पाटील यांना खातेच समजत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा - राज ठाकरे


आर.आर.पाटील यांना खातेच समजत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा - 

राज ठाकरे


'११ ऑगस्टच्या घटनेला जेवढे पोलिस आयुक्त जबाबदार होते तेवढेच गृहमंत्रीही जबाबदार होते. त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.' 

अरुप पटनाईक यांच्या बदलीतून राज्यकर्ते आणि पोलिस खात्याने बोध घ्यावा असे सांगत राज म्हणाले,  लोकांचा राग काय असतो हे यांना समजले पाहिजे. 

गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर पुन्हा टीका करताना ते म्हणाले, 'यांना जर खातं काय आहे हेच अजून कळत नसेल तर त्यांनी स्वतः राजीनामा देऊन दूर व्हायला हवे होते.' आपल्याला ज्या कामात गती नाही ते करायचेच कशाला, असा टोलाही ठाकरेंनी हाणला. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. मात्र, ११ ऑगस्टला त्यांनी ज्या पद्धतीने कारवाई करणे आपेक्षित होते ती त्यांच्याकडून घडली नाही. आरोपींचा शोध घ्यायचा तर ते म्हणतात, रमजान महिना संपल्यानंतर तपास केला जाईल.  तोपर्यंत गुन्हेगार तुमची वाट पाहात मुंबईत थांबणार आहेत का ? असा संतप्त सवाल त्यांनी केली. 

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा.सु.गवई या दलित नेत्यांवर राज यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण होती की, शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा यापैकी पहिल्या दोन गोष्टी बहुतेक हे नेते विसरलेले आहेत. 

राज्यात एवढे प्रश्न आहेत, दुष्काळ पडला आहे. यावर हे एक अक्षर ही बोलत नाहीत. केवळ बाबासाहेबांच्या नावाने राजकीय पोळी भाजायची एवढेच त्यांना माहित आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS