हिमालयातही येईल सुनामीची आपत्ती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2012

हिमालयातही येईल सुनामीची आपत्ती

हिमालयातही येईल सुनामीची आपत्ती

समुद्रतळाशी होणार्‍या भूकंपामुळे उसळणार्‍या पल्रयकारी सुनामी लाटा किनार्‍यावर धडकून प्रचंड हाहाकार उडवून देतात. सुनामीचा हा तडाखा प्रामुख्याने किनारपट्टी प्रदेशाला बसतो, समुद्रापासून शेकडो मैलांवर असलेल्या हिमालयापर्यंत ही आपत्ती पोहोचणे शक्यच नाही. मात्र पर्यावरणात होत असलेल्या उलथापालथीमुळे हिमालयालाही अशा संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. 

अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या हिमालयासमोरची संकटे अशीच वाढत गेली तर संपूर्ण दक्षिण आशियात हाहाकार उडू शकतो. हे सर्व हवामानातील बदलांमुळे घडून येणार आहे. गेल्या काही वर्षात हिमालयात हिमनद्या वितळून मोठमोठी सरोवरे तयार होत आहेत. भूकंपप्रवण असलेल्या हिमालयात नऊ रिश्टर स्केल भूकंपाची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास तिथे दरडी कोसळतील, सरोवरे फुटतील व त्यामुळे नद्यांना महापूर येतील. हे पूर सुनामी आपत्तीएवढेच भयंकर असतील. या हिमालयीन सुनामीच्या भयंकर संकटामुळे 150 कोटी लोकसंख्येच्या दक्षिण आशियातील लोकांचे जीवन धोक्यात येईल, अशी भीती नेपाळी पत्रकार कुंदा दीक्षित यांनी व्यक्त केली आहे. काठमांडूमध्ये दक्षिण आशियाई पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संभाव्य आपत्तीबाबत सर्वसामान्य लोक व राज्यकत्र्यांना आतापासूनच समजावून सांगण्याची गरज आहे. या संकटाचे व्यवस्थापन करताना फक्त स्वत:च्या देशापुरता विचार न करता संपूर्ण प्रदेशाची काळजी गेण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यंनी केले. हिमनद्या वितळण्याची समस्या गांभीर्याने घेतली नाही तर हिमालयातील जलमनोरा तिबेट संकटात सापडणार आहे. भारत, नेपाळ, चीन एवढेच नाही तर व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड या देशांतून वाहणार्‍या नद्यांवरही त्याचा परिणाम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS