| विलासरावांच्या अस्थी आज मुंबईत मुंबई : दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या अस्थी सोमवारी मुंबईत आणल्या जात असून येत्या 30 ऑगस्टपर्यंत त्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी सकाळी 11 वाजता बाभळगाव येथील विलासराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन विलासरावांचा अस्थीकलश विधिवत आपल्या ताब्यात घेणार आहेत. तेथून हा अस्थीकलश दुपारी दीड वाजता विमानाने मुंबईत आणला जाईल. दुपारी अडीच वाजता एलफिस्टन रोडजवळील टिळक भवन या काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात या अस्थी आणण्यात येतील. दुपारी तीन वाजता त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा निरीक्षक पालक वा संपर्कमंर्त्यांकडे सुपूर्द करण्यात येतील. 29 आणि 30 ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यालयात या अस्थी लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतील. 30 तारखेलाच त्यांचे त्या-त्या जिल्ह्यातील पवित्र ठिकाणी विसर्जन केले जाईल. मुंबईत या अस्थी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील राजीव गांधी भवनमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येतील. 30 ऑगस्टला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत बाणगंगा येथे या अस्थींचे विसर्जन केले जाईल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. |
Post Top Ad
27 August 2012
Home
Unlabelled
विलासरावांच्या अस्थी आज मुंबईत
विलासरावांच्या अस्थी आज मुंबईत
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment