पत्रकार म्हणून घुसखोरी / रिलायन्सचा अधिकारी पोलिसांच्या तावडीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2012

पत्रकार म्हणून घुसखोरी / रिलायन्सचा अधिकारी पोलिसांच्या तावडीत









पत्रकार म्हणून घुसखोरी
रिलायन्सचा अधिकारी पोलिसांच्या तावडीत
एका ध्वनीफित प्रदर्शनाच्या कार्यक्रमात पत्रकार म्हणून घुसखोरी करणा-या रिलायन्सच्या अधिका-यावर पोलिस स्टेशनमध्ये रात्र काढण्याची नुकतीच वेळ आली. 

झी टीव्हीच्या सारेगमपची विजेती वैशाली माडेच्या सुकून आणि कृष्ण वेधिला अशा दोन नव्या ध्वनीफितींच्या प्रकाशनाचा कार्यक्रम दादर येथील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पत्रकारांसह अनेक जण उपस्थित होते. यामध्ये एक अनाहूत व्यक्तीही होती. आयोजकांनी चौकशी केली असता त्या व्यक्तीने प्रथम एका मोठ्या मराठी वर्तमानपत्राचे नाव सांगून पत्रकार असल्याचे सांगितले, परंतु त्याच्या दुर्देवाने त्याने ज्या वर्तमानपत्राचे नाव सांगितले त्या वर्तमानपत्राचा पत्रकार तेथे उपस्थित होता.  

जेव्हा त्याची उलटतपासणी सुरू केली तेव्हा त्याने आपण खोटे बोललो, असे सांगून रिलायन्समध्ये अधिकारी असल्याचे सांगितले. सुरेश पी. मखिजा नाव असलेले ओळखपत्र आणि व्हिजिटिंग कार्डही त्याने दाखवले. कार्डवर नागोठणे येथील रिलायन्सच्या कार्यालयाचा पत्ता होता. पार्टीचे आमंत्रण कोणी दिले, असे विचारले असता त्याने काहीही सांगितले नाही. दिव्य मराठीने व्हिजिटिंग कार्डवरील नागोठणे येथील रिलायन्सच्या कार्यालयात फोन करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथे कोणीही फोन उचलत नव्हते. त्यावरून त्या व्यक्तीने दिलेले व्हिजिटिंग कार्ड आणि ओळखपत्र खोटे असावे अशीच शंका येत आहे. बॉलीवूडमधील काही प्रचारकांशी याबाबत बोलणे केले असता त्यांनी अशा प्रकारे फिल्मी पार्ट्यांमध्ये घुसखोर मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे मान्य केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS