.. तर दंगल झाली नसती - सुरेश खोपडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2012

.. तर दंगल झाली नसती - सुरेश खोपडे

.. तर दंगल झाली नसती - सुरेश खोपडे
मुंबई : हिंदू-मुस्लिमांच्या मनातील अनेक दिवसांपासून साचलेल्या क्लेषाचे उदाहरण म्हणजे 11 ऑगस्टची आझाद मैदानातील दंगल होय. मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून हा क्लेष कमी करता आला असता, मात्र तत्कालीन पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी मोहल्ला कमिटीचा मार्ग बंद करून टाकल्यामुळे अरुप पटनायक यांचा जनतेशी संवाद तुटला होता. भविष्यात अशा घटना होऊ द्यायच्या नसतील तर मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या मनातला संवाद बाहेर आणण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी पत्रकार संघ येथे व्यक्त केले.

संवादाचे प्रभावी माध्यमच भविष्यातील दंगली आटोक्यात आणू शकतील. पोलिसांचा शारीरिक वापर होत आहे. बौद्धिक वापर होत नाही. बौद्धिक वापर झाला तर आयबी, रॉ, सीबीआय यासारख्या संस्थांची गरज भासणार नाही. सामान्य माणसांच्या मनामध्ये बरेच काही सुरू असते. त्यांच्या मनातील विचारांना वेळीच ओळखून पुढील संभाव्य धोके आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची गरज आहे. ती सध्या होत नाही. टीमवर्क होण्याची गरज आहे. गोळीबार करून समाज शांत होत नसतो. त्यासाठी कोंबडी व तिच्या पिसांचे सूत्र अवलंबून सेक्टम मेथड बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांची इच्छाशक्ती नाही. त्यांचा राजेशाही थाट, हक्क, मान आदी घटकांवर घाला येऊ शकेल, या भीतीपोटी कुठलाही अधिकार चाकोरीच्या बाहेर येऊन काम करत नाही. बदली करून प्रश्न सुटणार नाही तर व्यवस्था बदलली पाहिजे. वरवरची मलपट्टी नको आहे, असे खोपडे यांनी शेवटी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS