सुगंधी दूध वितरणाचा पहिल्याच दिवशी फज्जा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2012

सुगंधी दूध वितरणाचा पहिल्याच दिवशी फज्जा

सुगंधी दूध वितरणाचा पहिल्याच दिवशी फज्जा
मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि आतापर्यंत बर्‍याचवेळा संगुधी दूध सुस्त करण्याचा घोषणांनंतर मोठा गाजावाजा करून पालिका विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सुगंधी दुधाचे वाटप मंगळवारपासून सुरू झाले खरे, परंतु त्या दुधाचा सुगंध इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंतच्या मुलांपर्यंत पोहचू शकला नाही. त्यामुळे दूध वितरणातील सावळागोंधळ पहिल्याच दिवशी स्पष्ट झाल्याने सुगंधी दूध वाटपाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. मोठी मुले दूध पितात आणि लहान मुले आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे पाहताहेत, असे केविलवाणे चित्र अनेक पालिका शाळांमध्ये पहावयास मिळाले.

शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत सन 2006-07 पासून महापलिका प्रशासनाने आपल्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अंतर्गत पालिका शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना 'सुगंधी दूध' पुरवण्याची महत्त्वाकांक्षी योजना पालिकेने सुरू केली. हे दूध सकस, गोड आणि सुगंधी असल्याने विद्यार्थी देखील ते आवडीने पीत होते; परंतु मध्येच हे दूध प्यायल्यानंतर मुलांना काही त्रास सुरू झाल्याने त्यावर प्रचंड आरडाओरड झाली. अखेर पालिका प्रशासनाला दूध वितरण थांबवावे लागले. त्यानंतर अनेक महिन्यांचा कालावधी लोटला. अनेक वेळा पुन्हा सुगंधी दूध वाटप करण्याचा मुहूर्तही जाहीर करण्यात आला; परंतु सुगंधी दूध वितरण मात्र सुरू होऊ शकले नाही.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS